ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फॅक्ट चेक

केंद्र सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार का? या निर्णयाचा महाराष्ट्रातील किती शेतकरी लाभार्थी होणार..

Will central government forgive farmers' debts? How many farmers in Maharashtra will be the beneficiaries of this decision?

एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान शेतकरी मानधन योजना, (Prime Minister’s Crop Insurance Scheme, Prime Minister’s Farmer Honor Fund Scheme, Prime Minister’s Farmers Honorarium Scheme) अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते. अशा योजनांमधून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन अधिक सुसाह्य व्हावे यासाठी विविध योजना राबवित असते.

मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांवरील कर्जमाफी (Debt forgiveness) करणार का या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) कृषी संबंधित केंद्रीय माहिती वेळोवेळी देत असले तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास इच्छुक दिसत नाही.

एकीकडे देशातील शेतकऱ्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे, संसदीय अधिवेशनाच्या (Parliamentary session) कामकाजामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे त्याबद्दल केंद्र सरकार कोणते पाऊल उचलणार? केंद्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? या प्रश्नांची उत्तरे देताना केंद्रीय वित्त मंत्री भागवत कराड (Union Finance Minister Bhagwat Karad) यांनी केंद्र सरकारचा सध्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे.

फॅक्ट चेक : ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पिक विम्याचा मोफत अर्ज भरता येईल का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

महाराष्ट्रामधील (Maharashtra) शेतकऱ्यांवर 153658.32 कोटी रुपये कर्जाचा भार आहे कोरोना सारखी परिस्थिती तसेच येणारे नैसर्गिक संकट यामुळे आधीच शेतकरी बेजार झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील शेतकऱ्यांवर देखील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे राज्य निहायत कर्जाची आकडेवारी तामिळनाडू : 189623.56 कोटी रुपये आंध्रपद्रेश : 169322.96 कोटी रुपये, उत्तर प्रदेश: 155743.87 कोटी रुपये, महाराष्ट्र : 153658.32 कोटी रुपये, कर्नाटक : 143365.63 कोटी रुपये

पंजाब राज्य सरकारकडून (Punjab State Government) शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळाला आहे, सरकारनं शेतकऱ्यांच 590 कोटी रुपयांच कर्ज माफ करत असल्याचं जाहीर केलं आहे. आतापर्यंत पंजाबमध्ये 5.64 लाख शेतकर्यांचं 4 हजार 624 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button