देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे , कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना राबवित आहेत, त्यामध्येच अनेक घरगुती उपाय देखील सोशल मीडियावर फिरत आहे, त्यातीलच एक उपाय म्हणजे काळी मिरीचा खाण्यात वापर केल्यामुळे कोरोना शंभर टक्के बरा होतो काय म्हणत आहे WHO किती तथ्य आहे या वाक्यामध्ये ते आपण जाणून घेऊयात.
पाँडिचेरी मधील एका विद्यार्थ्याने कोरोना वर आयुर्वेदिक औषध निर्माण केले आहे. त्याला WH O देखील मान्यता दिली आहे. एक चमचा मिरपूड एक चमचा आले रस, व एक चमचा मध सलग पाच दिवस घेतल्यास कोरोनाच्या संसर्गापासून मुक्तता मिळते. अशा आशयाचा हा मेसेज आहे.
पाँडिचेरी विद्यापीठामध्ये याची चौकशी केली असता या मेसेज मध्ये तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे असे कोणतेही औषध तयार केला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या चुकीच्या उपयोगामुळे दुष्परिणाम आणि दुसरे आजार होऊ शकतात किंवा मृत्यूही ओढावू शकतो.
आयुष मंत्रालया यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता काढा, हळदीचे दूध, तसेच व्यायाम करणे सुचवले आहे.
काळी मिरी ही सर्दी खोकला यावर आराम मिळवून देते परंतु हे कोरोना वरचे औषध नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
👩💻 हे पण वाचा:
१) नगरच्या कृषी उत्पन्न समिती मध्ये मिरचीच्या दराचा ठसका पहा : लाल मिरची ,लवांगी मिरची, बेडगी मिरचीला किती आलाय दराला रंग…
२) येत्या तीन दिवसांमध्ये या जिल्ह्यात पावसाची शक्यता