बाजार भाव

Market Rates | सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या किंमतीत वाढ, हरभऱ्यात घसरण; काकडीला चांगला भाव!

सोयाबीन: ब्राझीलमधील पूर आणि त्यामुळे झालेल्या पिकनुकसानीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १२.१६ डॉलर प्रतिबुशेल्सवर पोहोचले होते. याचाच परिणाम देशांतही दिसून येत आहे. आज प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव ४८०० रुपयांपर्यंत वाढवले आहेत. बाजार समित्यांमधील भाव ४३०० ते ४६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. काही अभ्यासकांचा अंदाज आहे की सोयाबीनच्या किंमतीत ही वाढ काही दिवस तरी टिकून राहू शकते.

कापूस: कापसाच्या किंमतीत चढउतार सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७७ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५७ हजार ६६० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून टिकून आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील भाव ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज आहे की येत्या काही दिवसांत कापसाच्या किंमतीत आणखी चढउतार दिसू शकतात.

कांदा: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या किंमतीत क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात कांद्याची आवक मात्र स्थिर आहे. आज कांद्याला बाजारात १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. निर्यातबंदी उठवताना सरकारने ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला आहे. परिणामी भारतातून कांदा निर्यात कमी होऊन भाववाढ मर्यादित राहण्याचा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

हरभरा: केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्क काढून टाकल्याने आज हरभऱ्याच्या किंमतीत काहीशी नरमाई आली आहे. देशात कडधान्याचे भाव वाढले होते. देशातील हरभरा उत्पादन यंदा कमी आहे आणि मागणीही असल्याने भाव हमीभावापेक्षा जास्त होते. हे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क काढून टाकले होते. यामुळे भाव ५५०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत नरमले होते. पण हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही असेच अभ्यासकांनी सांगितले आहे.

काकडी: काकडीला सध्या चांगला भाव मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडीचे भाव खात असतात. मात्र सध्या बाजारात काकडीची आवक कमी आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव मिळत आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही काकडीची मागणी वाढली आहे. सध्या राज्यभरात काकडीला प्रतिक्विंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button