ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

जाणून घ्या, शेवग्याच्या शेतीधून व्यावसायिक कमाईची संधी..

Know, the opportunity of commercial income from sugarcane cultivation ..

शेवग्याचे वैज्ञानिक नाव ‘मोरिंगा ओलिफेरा’ (‘Moringa olifera) असे आहे शेवग्याचे औषधी गुणधर्म देखील आपणास बहूपरिचित आहेत शेवग्याचा ( Drumstick) उपयोग अन्न म्हणून तर होतोच परंतु औषधनिर्मितीसाठी,औद्योगीक ( pharmaceuticals, industrial) कार्यासाठी देखील शेवग्याचा उपयोग केला जातो.

शेवाग्याचा सर्वात जास्त आहारात उपयोग दक्षिण भारतीय लोक करत असतात फक्त भारतातच नव्हे तर फिलीपिन्स, हवाई, मेक्सिको, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशांमध्येही शेवग्याची शेती केली जाते. शेवग्याच्या शेतीमधून अधिक उत्पादन (Production) देखील काढले जाते.

शेवग्यामध्ये अँटीबायोटिक अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल (Antibiotic Antifungal, Antibacterial) मोठ्या प्रमाणात गुणधर्म असतात. शेवग्याच्या पानांचा उपयोग करून बनवण्यात येणारे ‘मोरिंग्या सिरप’ (‘Moringa syrup’) तीनशेपेक्षा अधिक रोगांवर उपचार म्हणून वापरण्यात येतो शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. शेवग्याचे साल, पाने, बियाणे, डिंक, रूट (Sugarcane bark, leaves, seeds, gum, root) इत्यादीपासून आयुर्वेद औषध (Ayurvedic medicine) तयार करता येते.

अ‍ॅक्वापॉनिक्स शेती म्हणजे एक भन्नाट नवीन तंत्र, कशी फायदेशीर ठरेल अ‍ॅक्वापॉनिक्स शेती…

शेवग्याचे पीक कोरडवाहू जमिनीत (In dryland soils) येत असल्यामुळे अधिक फायदेशीर ठरते शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारचीच जमीनच असावा अस काही नाही, हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे, शेवग्याच्या पिकाला पाणी देखील खूप कमी प्रमाणात लागते शेवग्याची शेती कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button