फॅक्ट चेक : ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पिक विम्याचा मोफत अर्ज भरता येईल का? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Fact Check: Can I apply for free crop insurance at the Gram Panchayat office? Learn more
खरीप हंगामासाठी (kharif season) पीक विम्याची (Crop insurance) अंतिम मुदत 15 जुलै होती परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता ही मुदतवाढ 23 जुलै पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनाच्या मनात असा प्रश्न पडला असेल ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यालय मध्ये पिकविमा अर्ज मोफत भरता येईल का? तरी या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक कर्ज घेतलेलं नाहीये, त्या शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज गावातल्या ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार केंद्रातून (Your government from the center) मोफत भरून दिले जातील. आपले सरकारच केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून जमा केलेली विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 3 दिवसांच्या आत ऑनलाईन जमा करावी.
वाचा : Fact Check: कोबीमधून कोरोना होतो? जाणून घ्या सत्य काय आहे…
आपले सरकारचे व्ही.एल. इ शेतकऱ्यांचा पिक विमा अर्ज व्यवस्थित भरून सर्व कागदपत्रे अपलोड (Uploading documents) करतील पिक विमा अर्ज भरल्यानंतर कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही.
पिक विमा योजना अनिवार्य होती परंतु 2020 मध्ये हा निर्णय बदलून ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतात.तुम्ही जर कर्जदार शेतकरी असाल आणि तुम्हाला या योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसेल सात दिवसाच्या आतमध्ये शपत पत्र बँकेत जमा करायचं आहे.
आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय? (What is your government service center?)
स्थानिक संस्थांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबवला जात आहे. यामध्ये ग्रामपंचायतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे दाखले गावातच ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देणं, तसंच इतर व्यावसायिक आणि बँकिंग सेवा (Banking services) एकाच केंद्रावर दिल्या जातात. गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येक ग्रामपंचायतीला 4 लाख रुपये इतका निधी जातो.
पिकविमा बद्दल थॊडाक्यात माहिती.. (Brief information about crop insurance)
खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड, रोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यानं होणारं नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते.
खरिप हंगामातील (Kharif season) हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
2. शेतकऱ्यांना दिलासा : थकीत पिक कर्जाबाबत, राज्य सरकारचा मोठा निर्णय!