गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रतील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?
How many farmers in Maharashtra have committed suicide in the last three years?
कोरोनाचे संकट, (Crisis of corona) दुबार पेरणीचे संकट तर कधी कोरडा दुष्काळ यातून सुटका झाली तर बाजारभावचा तडाखा, कष्ट करूनही शेतकऱ्यांना सजा तर व्यापारी लोकांची मज्जा अशा अनेक आव्हानांना सामोरे जात शेतकरी आपली शेती करत असतो. जगाला अन्न पुरवीत असताना या शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन वेळेस अन्न मिळणे कठीण, संकटाला सामोरे जात कधी पुन्हा उभे राहतात तर काही कर्जाच्या बोज्याला कंटाळून अखेर जीवन संपवतात.
गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) किती शेतकऱ्यांनी आत्महत्या (Suicide) केली आहेत याचा कधी विचार झाला आहे का? आत्महत्या थांबवल्या जाव्यात यासाठी सरकारने काय उपाययोजना (What measures the government) केल्यात आपण या सदरमध्ये पाहणार आहोत
शेतकरी प्रश्नावर अनेकदा राजकारण करत असतात परंतु शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र कोणाकडे त्याचे उत्तर नसते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे 2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2680 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे.
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने केलेले उपाय योजना :
शेतकऱ्यांसाठी नियमित केंद्र सरकार (Central Government) विविध योजना राबवित असते. सावकारीमधून मुक्तता मिळावी यासाठी सरकारने शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी पिक कर्ज योजना चालू करण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी दिलेल्या माहितीनुसार 2008-09 मध्ये कर्जमाफी करण्यात आली होती, त्यावेळी 3.73 कोटी शेतकऱ्यांच्या 52 हजार 259 कोटी रुपयांची कर्जमाफी (Debt forgiveness) देण्यात आली होती.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :