ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा! पीक कर्ज वाटपाचे दर जाहीर

अमरावती, ०३ मे २०२४: आर्थिक संकटात सापडलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) पीकनिहाय हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केले आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे पीक कर्ज मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या पिकांची उत्पादकता वाढण्यास हातभार लागेल.

पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • कपाशी (जि): ६०,५०० ते ६३,५२५ रुपये प्रति हेक्टर
  • ज्वारी (सं): २९,९६० ते ३१,९७० रुपये प्रति हेक्टर
  • तूर: ४१,५८० ते ४३,५६० रुपये प्रति हेक्टर
  • सोयाबीन: ५०,८३० ते ६१,२१५ रुपये प्रति हेक्टर
  • मूग: २४,२०० ते २५,४१० रुपये प्रति हेक्टर
  • उडीद: २४,२०० ते २५,४१० रुपये प्रति हेक्टर
  • गहू: ४४,२०० ते ४६,२०० रुपये प्रति हेक्टर
  • हरभरा: ३१,६८० ते ४३,८९० रुपये प्रति हेक्टर
  • कांदा: ६६,६७५ ते ७४,९७० रुपये प्रति हेक्टर
  • भुईमूग (ख): ३६,३२० ते ४२,९९० रुपये प्रति हेक्टर
  • मिरची: ६६,६७५ ते ८५,९९५ रुपये प्रति हेक्टर
  • संत्रा-मोसंबी: १,०५,६०० ते १,१६,१६० रुपये प्रति हेक्टर
  • केळी: १,०५,००० ते १,१०,२५० रुपये प्रति हेक्टर

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेचे पीक कर्ज सेवा सहकारी सोसायटीमार्फत तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button