ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फॅक्ट चेक

FACT CHECK : खतांच्या दरांमध्ये वाढ नाही, पहा काय आहे केंद्र सरकार निर्णय!

FACT CHECK: No increase in fertilizer rates, see what is the decision of the central government!

दोन दिवसापूर्वी खतांच्या दरात वाढ झाली आहे असे परिपत्रक विविध माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर, खतांमध्ये वाढ झाली ची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. मात्र तूर्तास तरी, खतांच्या किमतीमध्ये मध्ये वाढ होणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र शासनाने निर्वाळा व्यक्त केला आहे केंद्रीय रसायने व खत विभागाचे राज्यमंत्री मनसुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सद्य परिस्थितीमध्ये कोणतेही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच बरेच शेतकरी इफको कंपनीच्या दाराचे परिपत्रक का काढण्यात आले अशी विचारणा करत होते यावर उत्तर देताना संचालक योगेन्‍द्र कुमार, यांनी असे म्हटले आहे की, हे आमच्या प्रशासकीय कामाचे परिपत्रक आहे, या दराचा शेतकरी वर्गासाठी उपलब्ध असलेल्या दाराशी कोणताही संबंध नाही.

सध्यातरी शेतकऱ्यांना खते जुन्याच दराने मिळणार आहेत,जुन्या खताचा साठा अजून शिल्लक असून त्याची विक्री जुन्या किमती प्रमाणे करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठी विक्रीकरिता उपलब्ध होणाऱ्या नव्या दराची दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत असेही पुढे ते म्हणाले.

पहा खालील परिपत्रक :-

खतांच्या दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button