ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

सोयाबीनचे भाव भिडले गगनाला: प्रतिक्विंटल दहा हजार रुपये पर्यंतचा भाव, ‘या’ दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Soybean prices skyrocketed to Rs 10,000 per quintal, who exactly benefited from this price hike?

लातुर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये (International market) सोयाबीनची (soybeans) मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचप्रमाणे यावर्षी सोयाबीन तेलाचे मोठ्या प्रमाणात दरवाढ, मागील वर्षी असणारा सोयाबीनचा अपूर्ण पुरवठा (Incomplete supply) या सर्वांमुळे सोयाबीनचे भाव गगनाला भिडले आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या वाढत्या दरवाढीमुळे सोयाबीन विकले नव्हते त्या शेतकऱ्यांना निश्चिती याचा फायदा झाला. मराठावाडा,विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची यापूर्वी विक्री केली नसल्यामुळे त्यांना दरवाढीचा (Inflation)निश्चितच फायदा झाला.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, (In Latur Agricultural Produce Market Committee) सोयाबीनच्या दराचा उच्चांक भाव मिळत प्रति क्विंटल 9881 रुपये बाजार भाव मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई केली नाही त्यांना या संधीचे सोने करत आले परंतु राज्यांमधील बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकला आहे.

वाचा : जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत (In Washim Agricultural Produce Market Committee) देखील सोयाबीनला भाव प्रतिक्विंटल 9 हजार 600 रुपये पर्यंत मिळाला बुलढाणा जिल्ह्यात देखील सोयाबीनचा बाजार भाव नऊ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला असल्याने सर्वाधिक फायदा व्यापारी (Merchant) वर्गास होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

One Comment

  1. सोयाबीन च वाढलेल भावाच किंमत फक्त जे व्यापारी वर्ग आहे त्यानांच याच फायदा आहे. आम्हा शेतकरी वर्गाला काहीच फायदा नाही . मनापासून अभिनंदन धन्य हो या देशाची system

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button