‘समृद्धीसाठी’ नगर जिल्हात 825 हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन; वाचा यामुळे नगरकरांना कसा फायदा होईल?
825 hectares of land to be acquired in Nagar district for 'Prosperity' Read: How will this benefit the city dwellers?
संगमनेर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामधून दोन महत्वकांशी रस्ते जात आहे. त्यापैकी एक रस्ते वाहतूक म्हणजेच कोपरगाव तालुक्यामधून सिन्नर मार्गे थेट शहापूरला (Shahapur) जाणारा मुंबई ते नागपूर हा महामार्ग. महामार्ग 710 किलोमीटरचा आहे तसेच परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून सुरत -हैदराबाद (Surat-Hyderabad) हा सहापदरी महामार्ग तयार होणार आहे, हा महामार्ग नगर जिल्ह्यासह संगमनेर, तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, वडझरी आदी तेरा गावांसह जोडला जाणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दळणवळणच्या (communication) सोयीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
वाचा : सरकारी अनुदान घेऊन करा ‘हा’ व्यवसाय, एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर होतील आठ लाख रुपये…
दोन्हीही महामार्ग सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) दोडी जवळचे जाणार आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा कायापालट नक्कीच होणार आहे. या महामार्गांसाठी राहुरीतील अठरा, नगर तेरा, जामनेर शहरातील पाच अशा एकूण 49 गावांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे शेतमालाची गोदामे तसेच छोटे-मोठे व्यवसायिक, कार्यालय यांना निश्चितच फायदा होणार आहे नगरचा या महामार्गामुळे तसेच दळणवळणाचा वेगही वाढणार आहे. भविष्यामध्ये वडगाव पान, समानापूर येथे मोठी आर्थिक उलाढाल होवू शकते. दोन्ही महामार्गाचा संगमनेर तालुक्यात चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये संगमनेर तालुका मोठी बाजारपेठ (Market) म्हणून नावारूपाला येऊ शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :