कृषी बातम्या

पशुखाद्याच्या किंमतींमध्ये मोठी दरवाढ, दुधाची दरवाढ शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली?

Large price hike in animal feed prices, increase in milk price has benefited farmers?

राज्यामध्ये गाईच्या (cow) दुधाला एक रुपये दरवाढ तर म्हशीच्या (buffalo) दुधाला दोन रुपये दरवाढ मिळाली आहे. परंतु ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली का ? गेल्या दोन महिन्यात 300 रुपयांनी पशुखाद्याच्या किंमतीमध्ये (In the price of animal feed) वाढ झाली आहे, त्यामुळे दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

पशुखाद्य तयार करणाऱ्या कच्च्या मालामध्ये (raw materials) 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे, चाळीस किलोच्या पोत्यामागे दोन महिन्यांमध्ये दीडशे रुपये पर्यंतचे वाढ झाली आहे. अशी दरवाढ सुरू राहिल्यास दुधाच्या किंमती वाढवला तरीही शेतकऱ्यांना ही दरवाढ परवडत आहे का याचा विचार केला पाहिजे. अशा स्थितीमध्ये दुग्ध उत्पादन व्यवसाय (Dairy business) कसा करावा हादेखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

वाचा : पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

अनेक शेतकरी शेती व्यवसायात जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात, दिवसेंदिवस वाढणारी ही महागाई, कोरोनाचे संकट, (Crisis of corona,) शेतमालाला मिळणारा तोडका बाजार भाव, तसेच नैसर्गिक संकट (Natural disasters) यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.

वाचा : आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..

वाचा : आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…

पशुखाद्यासाठी वापरण्यात येणारे मका, गहू भुसा, डिओईल राईस पॅन (Deoil Rice Pan) याचा वापर केला जातो.परंतु याच्या दरामध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याकारणाने, पशुखाद्यात मोठी वाढ झाल्याचे कारण समजते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. मोठी बातमी : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, ‘इफकोचा नॅनो युरिया’…

2. “या” व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल छोट्या उत्पन्नातून मोठी कमाई करण्याची संधी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button