ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Tur Udid Stock Limit | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तूर आणि उडदावर लावले स्टॉक लिमिट, जाणून घ्या दरात होणार का मोठी घसरण आणि किती लावलंय लिमिट?

Central government's big decision! Stock limit imposed on Tur and Udada, know why there will be a big fall in the price and how much is the limit imposed?

Tur Udid Stock Limit | देशात खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी या खरीप हंगामात सध्या तुरीच्या आणि उडीत पीक घेण्यास पसंती देत आहेत. सध्या बाजार पेठांमध्ये तुर आणि उडीद दरात तेजीने वाढ होत आहे. वाढत्या तुरीच्या आणि उडीद दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता प्रयत्न सुरू केला आहे. तुरीचे आणि उडीद दर (Tur Udid Stock Limit) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला असून याचा परिणाम व्यापारी आणि शेतकरी वर्गावर होऊ शकतो.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

देशात वाढलेले तूर आणि उडीदाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तुर आणि उडीदाच्या स्टॉकवर (Tur and udid Stock Limit) लिमिट ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊयात सरकारकडून तुर आणि उडीदाच्या स्टॉकवर केंद्र सरकारने किती लिमिट ठेवण्यात आला आहे.

दरवाढ रोखण्यासाठी लावले स्टॉक लिमिट

यंदा बाजारामध्ये तूर आणि उडीदाची आवक कमी होती. त्यामुळे मागणीच्या अभावी तूर आणि उडीदाच्या दरात वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी डाळींच्या साठ्यावर 31 ऑक्टोंबरपर्यंत केंद्र सरकारने मर्यादा आणल्या आहे. त्यामुळे आता तूर आणि उडीद डाळीचा साठा करणाऱ्या व्यापारी, आयातदार, निर्यातदार आणि मोठे डाळींचे स्टोअर्स इत्यादींवर मर्यादा आणली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किती लावलं स्टॉक लिमिट?

जीवनावश्यक वस्तूंची आणि खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊ नये व सामान्य जनतेला खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, केंद्र सरकारने डाळींचा साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी 200 मेट्रिक टन हे घाऊक व्यापाऱ्यांसाठी तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 5 मेट्रिक टन एवढी मर्यादा लावली आहे.तसेच, हा साठा सीमा शुल्क मंजुरीच्या 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत ठेवता येणार नाही.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Central government’s big decision! Stock limit imposed on Tur and Udada, know why there will be a big fall in the price and how much is the limit imposed?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button