ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामासाठी खतांवरील वाढवले अनुदान; जाणून घ्या कोणत्या खताला किती अनुदान?

Big decision of central government for farmers! Increased subsidy on fertilizers for Rabi season; Know how much subsidy for which fertilizer?

Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी खतांवर अनुदान (Fertilizer Subsidy) वाढवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या किमतीचा फटका बसणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी 22,303 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे.

किती वाढवले अनुदान?
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना युरियासाठी प्रति किलो 47.2 रुपये, फॉस्फरससाठी प्रति किलो 20.42 रुपये, पोटॅशसाठी प्रति किलो 2.38 रुपये आणि सल्फरसाठी प्रति किलो 1.89 रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी एकूण 22 हजार 303 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. तर यापूर्वी, रबी हंगामासाठी युरियासाठी प्रति किलो 44.75 रुपये, फॉस्फरससाठी प्रति किलो 18.62 रुपये, पोटॅशसाठी प्रति किलो 2.20 रुपये आणि सल्फरसाठी प्रति किलो 1.78 रुपये अनुदान मिळत होते.

हेही वाचा : Honda Activa Electric | धुमाकूळ घालायला येत आहे इलेक्ट्रिक होंडा ॲक्टिवा; 280km ची मिळणार रेंज, किंमत आहे फक्त…

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढत असल्या तरीही भारत सरकार शेतकऱ्यांना खतांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खते परवडतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात रब्बी हंगामात गहू, मका, ज्वार, बाजरी, चना इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांसाठी खतांची गरज असते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खतांची किंमत कमी होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title: Big decision of central government for farmers! Increased subsidy on fertilizers for Rabi season; Know how much subsidy for which fertilizer?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button