Government Decision | बिग ब्रेकिंग! राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार, घेण्यात आले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय
Government Decision | राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी (Government Decision) विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतले जातात. शासनाच्या माध्यमातून आता जमीनधारकांसाठी (Agriculture) तसेच सामन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. चला तर मग मंत्रिमंडळ (Government Decision) बैठकीतील महत्वाचे शासन निर्णय जाणून घेऊयात.
वाचा: RBI | बँक कर्मचाऱ्यांना लंचसाठी निश्चित तास नाहीत, ठेवल्यास ग्राहक ‘अशा’प्रकारे नोंदवू शकतात तक्रार
राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय
आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये सुधारणा (कंसात जुने दर देण्यात आलेत)
- राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफसाठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 नोव्हेंबर 2022 पासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार असून या सुधारणा वर्ष 2025-26 पर्यंत असतील.
- मृतांच्या कुटुंबियांना – 4 लाख रुपये (बदल नाही). चाळीस ते 60 टक्के अपंगत्व आल्यास – 74 हजार रुपये ( 59 हजार 100). साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास – 2.50 लाख रुपये (2 लाख).
- जखमी व्यक्ती इस्पितळात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी – 16 हजार रुपये (12 हजार 700), एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी – 5 हजार 400 ( 4 हजार 300).
- मृत दुधाळ जनावरांसाठी – 37 हजार 500 ( 30 हजार), ओढकाम जनावरांसाठी – 32 हजार रुपये (25 हजार). वासरू, गाढव, खेचर आदीसाठी – 20 हजार रुपये (16 हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी – 4 हजार रुपये (3 हजार). कुक्कूट पालन – 100 रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (50 रुपये प्रति कोंबडी, 5 हजार रुपयांपर्यंत).
शेती
- शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – 8 हजार 500 रुपये, 2 हेक्टर मर्यादेत (6 हजार 800). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी – 17 हजार रुपये प्रति हेक्टरी (13 हजार 500). बहुवार्षिक पिकांसाठी – 22 हजार 500 रुपये (18 हजार).
- शेतजमीनीच्या नुकसानीसाठी – 18 हजार रुपये प्रति हेक्टरी (12 हजार 200 रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी – 47 हजार रुपये, प्रति हेक्टरी. (37 हजार 500)
- मत्स्य व्यवसाय
बोटींच्या अंशतः दुरूस्तीसाठी – 6 हजार रुपये (4 हजार 100). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी – 3 हजार रुपये ( 2 हजार 100). पूर्णतः नष्ट बोटीकरिता – 15 हजार रुपये (9 हजार 600). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी – 4 हजार रुपये (2 हजार 600 रुपये). - वाचा: Subsidy | नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानासाठी काय आहेत पात्रता आणि अटी? जाणून घ्या सविस्तर…
महसूल नियमाबाबत महत्वाचा निर्णय
- महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला 7 मार्च 2024 पर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच जळगांव येथे 650 खाटांचे रुग्णालय व 150 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. यासाठी 711 कोटी 17 लाख 56 हजार रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Eknath Shinde | राज्य सरकारचं शेतकऱ्यांना डबल धमाका गिफ्ट! मंत्रिमंडळात विजेच्या सवलतीपासून 50 हजारांच्या अनुदानापर्यंत घेतले निर्णय
- SBI | बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या नवा बदल
Web Title: Big Breaking! In the state cabinet meeting, a major decision regarding land was made is an important change