ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Driving License Rule | ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा! आता चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज संपली

Driving License Rule | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम (Driving License Rule) लागू केले आहेत. ज्यामुळे नागरिकांना लायसन्स मिळवणे सोपे आणि जलद होईल.

या नवीन नियमांनुसार:

  • खासगी संस्थांना आता ड्रायव्हिंग चाचणी घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे. यामुळे सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयांवरील (RTO) भार कमी होईल आणि नागरिकांना लवकर चाचणी देण्यास मदत होईल.
  • नवीन नियमानुसार, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास दंडात्मक रक्कम वाढवण्यात आली आहे. आता हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागेल.
  • अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल आणि त्यांच्या वाहनचालक आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जातील. तसेच, त्यांना २५ वर्षांपर्यंत वाहनचालक परवाना मिळणार नाही.
  • रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन चालक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्येही बदल केले आहेत. आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल.
  • दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांच्या परवान्यांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.

वाचा: अरे वाह! बजाज ऑटोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात; पाहा किंमत आणि फीचर्स

याव्यतिरिक्त, खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांसाठीही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार:

  • खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांकडे आवश्यक सुविधा आणि पात्र प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
  • हलक्या वाहनांसाठी चार आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आणि जड वाहनांसाठी सहा आठवड्यांच्या आत प्रशिक्षण पूर्ण केले जाणे आवश्यक आहे.

या नवीन नियमांचा उद्देश वाहनचालकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि रस्त्यावरील वाहतूक सुरक्षा सुधारणे हा आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रावर चक्रावर वाऱ्याचे संकट! मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला विजांसह झोडपून काढणार पाऊस

या बदलांमुळे नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे अधिक सोपे आणि जलद होईल. तसेच, वाहनचालकांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केले जाईल ज्यामुळे रस्त्यावरील अपघात कमी होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button