ताज्या बातम्या

Milk Rates | अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

Milk Rates |बहुतांश शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा (Animal Husbantry) व्यवसाय करतात. शेतीतून उत्पन्न कमी मिळत असले तरी आर्थिक आधार असावा यासाठी हा व्यवसाय केला जातो. मात्र सध्या दुधाच्या दरात सुद्धा कपात सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात उन्हाळ्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थाला चांगली मागणी असताना देखील दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

दुधाच्या दरात अजून कपात होण्याची शक्यता

मागील २० दिवसांत गाईच्या दुधात सुमारे चार रुपयांनी घट झाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून टिकून असलेल्या गाईच्या दुधाचा ३८ रुपयांवरून थेट ३४ रुपयांवर आला आहे. देशांतर्गत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरात कपात केली गेली आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान दुधाच्या दरात अजून कपात होण्याची शक्यता आह. यामुळे दूध उत्पादक मात्र हतबल झाले आहेत.

दुग्धव्यवसाय झाला अस्थिर

दूध पावडर व बटरच्या दरावर दूध व्यवसाय अवलंबून आहे. एकेकाळी दूध व्यवसाय शाश्वत बनला होता. मात्र मागील सहा-सात वर्षांपासून सातत्याने हा व्यवसाय अस्थिर होत आहे. कोरोना संकटाच्या काळात दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाले होते. त्यावेळी १६ ते १७ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी केली जात होती. त्यानंतर दोन वर्षांत हळूहळू दूधदरात वाढ झाली.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

पुन्हा एकदा दुधाचे दर पडले

या आधी देखील दूध दरासाठी राज्यात आंदोलन करून संप करावा लागला होता. शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला संताप व्यक्त केला होता. गेल्या अनेक वर्षानंतर चार ते पाच महिन्यांपासून दुधाचे दर वाढत होते. पशुखाद्य व अन्य बाबींचा विचार केला तर सध्या मिळणारे दुधाचे दर समाधानकारक होते. मात्र आता पुन्हा एकदा दुधाचे दर पडले आहेत.

Milk rates are getting down day by day

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

One Comment

  1. इथे सर्वसामान्यांना साठ ते 80 रुपये लिटर दराने दूध घ्यावे लागत आहे. आणि अति तेथे माती करणारे जे लोक दूध संस्थांना रतीब घालत आहेत त्यांनी आपण योग्य भावामध्ये दूध कसे व कोठे वितरित करावे हे प्रथमतः समजून घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button