ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Cabinet Decision | राम मंदिर सोहळ्यानिमित्त ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ मोफत; घरकुलासाठी अनुदान दुप्पट वाढव!

Cabinet Decision | 5 kg wheat, 5 kg rice free on Ram Mandir festival; Double the subsidy for the crib!

Cabinet Decision | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या (Cabinet Decision) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या निर्णयांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि (Shivaji Jayanti celebrations) शिवजयंतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना (Ram Mandir Solah celebrations) श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (Free ration scheme India) आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, ५०० ग्रॅम रवा, २५० ग्रॅम डाळ आणि २५० ग्रॅम तेल मिळणार आहे.

तसेच, महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर असलेला सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.

वाचा : Ram Mandir | 84 सेकंदाचा शुभक्षण; फक्त 5 जणांचा प्रवेश; कोण आहेत ते खास 5? अयोध्येच्या भूमितीवर रामलल्लाचा ‘पुनर्जन्म’ होणार!

याशिवाय, मंत्रिमंडळाने खालील निर्णय देखील घेतले:

  • राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
  • ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी दिली गेली आहे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत (House construction subsidy India) घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार दिले जाणार आहे.
  • राज्यातील न्यायालयात अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत आणि ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या निर्णयाचे राज्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तसेच, सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे.

Web Title | Cabinet Decision | 5 kg wheat, 5 kg rice free on Ram Mandir festival; Double the subsidy for the crib!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button