ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Land Ownership Rights | शेतीच्या स्वप्नांना हवा देणारा निर्णय! १ कोटी २० लाख एकर जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची!

Land Ownership Rights A decision that gives life to farming dreams! 1 crore 2 million acres of land owned by farmers!

Land Ownership Rights | महाराष्ट्र विधानसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. राज्यातील सुमारे १ कोटी २० लाख एकर जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची करण्याचा सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठ्या दिलासादायक आहे. दशकांनच्या मागणीला यश येऊन शेतकऱ्यांच्या हातात (Land Ownership Rights) जमिनीचा हक्क मिळणार आहे.

१९६१ मध्ये जमीनधारणा कमाल मर्यादा निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार सरकारी जागा शेतकऱ्यांना कसण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या जमिनींची मालकी हक्क मात्र शासनाकडेच राहिली होती. या जमिनींवर सातबारा वर्ग-२ असे असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागला होता. आता याच जमिनींची मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा निर्णय खास प्रशंसनीय आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण होईल. जमिनीचा हक्क मिळाल्याने शेतकरी बँकांकडून कर्ज घेऊ शकतील, शेतीचा विस्तार करू शकतील आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावू शकतील. याचबरोबर जमीन मालकी हक्कामुळे शेतकऱ्यांच्या मनोबलालाही चालना मिळणार आहे.

वाचा : Drought Situation Review | केंद्रीय पाहणी पथकाची दुष्काळ पाहणी; २६०० कोटींची मदत, पण शेतकऱ्यांचं कष्ट कसं जपणार?

विधेयक सुधारणेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक उपयोगासाठी जमीन उपलब्ध होण्याचा आणि शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळण्याचा हा दुहेरी लाभ होणार आहे. गावठाण क्षेत्र वाढवण्याचा निर्णयही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पाच किलोमीटर गावठाण क्षेत्र निश्चित करण्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध होईल.

जमिनीच्या परतावळीच्या शुल्काबाबतही स्पष्टता करण्यात आली आहे. वर्ग-१ ची जमीन परत करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र वर्ग-२ ची जमीन वर्ग-१ मध्ये बदली करताना बाजारभावाच्या ७५ टक्के शुल्क आकारले जाणार आहे.

सरकारचा हा निर्णय निश्चितच शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठ्या सकारात्मक बदलाची नांदी आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा हक्क, आर्थिक स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्य यांचे मार्ग या निर्णयाने खुले करून दिले आहेत.

Web Title : Land Ownership Rights A decision that gives life to farming dreams! 1 crore 2 million acres of land owned by farmers!

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button