Stamp Duty On Loans | राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘इतक्या’ कर्जावरील मुद्रांक शुल्क होणार माफ; वाचा आनंदाची बातमी
Stamp Duty On Loans | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ₹1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क (Stamp Duty On Loans) माफ केले आहे. याचा अर्थ आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज (Crop Loan) घेताना ₹500 च्या स्टॅम्पऐवजी ₹1 च्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू आहे आणि नवीन पीक कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या कर्जावरील खर्च कमी होईल.
राज्य शासनाचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही घोषणा केली आणि संबंधित बँकांना आदेश दिले आहेत. अनेक शेतकरी या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांना याचा लाभ मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक, श्री. विकास गोलांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असे म्हटले आहे.
वाचा: दूध अनुदानासाठी मुदतवाढ! वंचित शेतकऱ्यांना आता ‘या’ तारखेपर्यंत माहिती भरण्याची संधी
कुठल्या कर्जाचे मुद्रांक शुल्क माफ होईल?
- ही मुद्रांक शुल्क माफी केवळ ₹1,60,000 पर्यंतच्या कर्जावरच लागू आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज घेणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकतात.
हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता केवळ ५ मिनिटांत मिळणार कृषी कर्ज, जाणून घ्या कसं…