ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Anudan Yojna 2023 |राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर बियाणे वाटप, जाणून घ्या पात्रता

Anudan Yojna 2023 |राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध शासन निर्णय घेण्यात येतात. देशातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. आता याबाबतचं महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमुद विविध 6 उपघटकांचा समावेश करुन सदरची योजना सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यास याव्दारे शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांना वैरण उत्पादनासाठी (Anudan Yojna 2023)प्रोत्साहनपर बियाणे वाटप
राज्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढण्याकरिता तसेच, पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे व त्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर वैरणीचे उत्पादन मोठया प्रमाणात घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रम राबविण्यात यावा.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

काय मिळणार लाभ आणि पात्रता?

  • या अंतर्गत वैरण बियाणांचा पुरवठा करतांना लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्वारी, मका, बाजरी, बरसिम, लुसर्न, न्यूट्रीफिड व इतर बियाणे तसेच नेपियर, यशवंत, जयवंत इ. सुधारित बहुवर्षिय गवत प्रजातींची ठोंबे वाटप करावीत.
  • ज्या लाभार्थीकडे स्वत:ची किमान 3 ते 4 जनावरे आहेत अशा लाभार्थीना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.
  • प्रति लाभार्थी एक एकरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी 100 टक्के अनुदानावर रु. 1,500/- (अक्षरी रु. एक हजार पाचशे मात्र) च्या मर्यादेत वैरणीच्या बियाणांचा / ठोंबांचा पुरवठा करण्यात यावा. 1.4. वैरणीची बियाणे व ठोंबांची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ (महाबिज), इतर शासकीय संस्था, कृषि विद्यापिठे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गतची प्रक्षेत्रे, यांच्याकडून करण्यात यावी.
  • वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात यावे.
  • वैरण बियाणे वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकांची निवड करण्यात यावी..
  • वैरणीच्या पिकां / ठोंबाकरिता आवश्यक खते, जिवाणू संवर्धके शेतकऱ्याने स्वत:च्या खर्चाने खरेदी करावीत.
  • या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. तसेच, एका एका हंगामात एकदाच लाभ देण्यात यावा.

Web Title: Big decision of the state government! Allotment of seeds to farmers for livestock production, know eligibility

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button