ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

Organic Farming | बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार प्रोत्साहन, जाणून घ्या राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Organic Farming | शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त / अधिकचा वापरामुळे जमिनीचा पोत खालावला आहे. तसेच रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीस (Organic Farming) सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या पध्दतीने सेंद्रिय शेती केली जात असल्यामुळे त्याचा परिणाम दिसून येत नाहीये. आरोग्याविषयी जनजागृतीमुळे प्रमाणित सेंद्रिय फळे आणि अन्नधान्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बाबी लक्षात घेता राज्य शासनाने कृषी विभागांतर्गत (Department of Agriculture) ‘डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन’ची स्थापना शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शासन निर्णय

राज्यात नैसर्गिक / सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला (Dr. Punjabrao Deshmukh Organic Farming Mission) सन 2022-23 ते सन 2027-28 या कालावधी करीता मुदतवाढ देऊन सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे, तसेच, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” असे संबोधण्यास मान्यता देण्यात येत आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

काय आहे उद्दिष्ट?

  • नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवून आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे.
  • नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्यसाखळी विकसित करणे.
  • नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे आणि कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात बाद करणे.
  • समुह संकल्पनेद्वारे 18.820 उत्पादक गटांची स्थापना करणे आणि गटांचे समुह तयार करून 1825 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे.
  • शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.

Web Title: Breaking! Farmers will get incentives for agriculture, know the important decision of the state government

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button