कृषी सल्ला

Fertilizers | पिकांना विद्राव्य खत देताय ? मग ही काळजी घ्याचं ; अन्यथा होऊ शकते नुकसान

Fertilizers |ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. पूर्वीच्या काळी अगदी पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. मात्र सध्या आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेतातील पिके चांगली यावीत, पिकांची जोमाने वाढ व्हावी, उत्पादन क्षमता वाढावी यासाठी विविध खतांचा वापर केला जातो. दरम्यान पिकांना विद्राव्य खते ( Soluble Fertilizers) देणे फायदेशीर ठरते.

Advantages | विद्राव्य खते देण्याचा फायदा

१) अतिशय जलद गतीने पिकांना अन्नद्रव्ये मिळतात.
२) खताची नासाडी होत नाही.
३) पीक फुल किंवा फलधारणा अवस्थेत असेल तर फायदा होतो.
४) अतिपाऊस व पाऊसाचा खंड असणाऱ्या ठिकाणी स्थायु खते वाहून जातात. अशावेळी विद्राव्य खते फायदेशीर ठरतात.

Precautions | विद्राव्य खते देताना ही काळजी घ्या.

विद्राव्य खते ही मुख्यतः पाण्यात विरघळून दिली जातात. अशावेळी स्वच्छ पाणी ( Clean water) वापरणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १ किलो खत विरघळण्यासाठी १५ ते २० लिटर पाणी लागते. तुम्ही जर ठिबक सिंचनद्वारे खत देत असाल तर पहिले १० मिनिटं साधे पाणी जाऊ द्यावे. यामुळे लॅटरल मधील खत शेवटच्या रोपापर्यंत पोहोचवणे सोप्पे जाते.

सर्व ड्रीपर्स चेक करून घ्या

ज्यावेळी तुम्ही दोन खते एकमेकांत मिसळत आहात, तेव्हा त्या खतांची व्यवस्थित माहिती घ्यावी. पिकाला खते देताना पिकाची सध्याची अवस्था, त्याचा वाफसा आणि वातावरणाचा अभ्यास करावा. सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असतील याची खात्री करून घ्या. अन्यथा पिकाला योग्य प्रमाणात खत मिळत नाही. तसेच ठिबक सिंचन मध्ये लिकेज आहे का ? हे सुद्धा चेक करा. अन्यथा खत वाया जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Pracautions for use of soluble fertilizers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button