ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Crop Loss | शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसामुळे ७८२ शेतकऱ्यांचे नुकसान, तर २ व्यक्तींचा मृत्यू

Crop Loss | परभणी जिल्ह्यात मंगळवार (९ एप्रिल) पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस (Crop Loss) आणि गारपीट काल (२४ एप्रिल) पर्यंत थांबला नाही. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ६० गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे ७८२ शेतकऱ्यांच्या ४४०.३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा या सहा तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात परभणी आणि पूर्णा तालुक्यातील १०१ हेक्टर जिरायती पिके, तर परभणी, सेलू, सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यांतील २११.७ हेक्टर बागायती पिके आणि परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यातील १२७.६१ हेक्टर फळबागांचा समावेश आहे.

वाचा: दूध अनुदानासाठी मुदतवाढ! वंचित शेतकऱ्यांना आता ‘या’ तारखेपर्यंत माहिती भरण्याची संधी

या नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानीही झाली आहे. परभणी, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यांतील २२ गावांमध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सोनपेठ आणि गंगाखेडमधील प्रत्येकी १ व्यक्तींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, २ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. दुर्दैवाने, या आपत्तीमध्ये लहान ३ आणि मोठी १३ अशी एकूण १६ जनावरे आणि ७ बैलही दगावले गेले आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता केवळ ५ मिनिटांत मिळणार कृषी कर्ज, जाणून घ्या कसं…

जिल्हा प्रशासनाने बाधित भागांचे पंचनामे सुरू केले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. पावसामुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा या सहा तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button