Poultry Farming |राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. तर दुसरीकडे प्राण्यांना देखील उन्हाचा चटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farm) अडचणीत आले आहेत. कारण उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोंबड्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढले
मागील वर्षी पोल्ट्री फार्ममध्ये दिवसाकाठी जास्तीत जास्त १५ ते २० कोंबड्यांचा मृत्यू होत होता. मात्र यंदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. एका पोल्ट्रीमध्ये सरासरी ५० कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. राज्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी पोल्ट्री व्यवसाय आहेत आणि सध्या त्याच ठिकाणचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे.
ते १२ टक्क्यांनी पक्षांची मर वाढली
यामुळे उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. तसेच अंडी उत्पादनात देखील मोठी घट झाली आहे. एकीकडे उन्हाचा वाढता पारा आणि दुसरीकडे विजेच्या भारनियमनामुळे पाण्याला ताण पडत आहे. यामुळे पोल्ट्रीमधील फॉगरसाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १२ टक्क्यांनी पक्षांची मर वाढली आहे.
उन्हाळ्यामुळे पक्षांची मागणी कमी
दरम्यान कंपनी ५ टक्के मर ग्राह्य धरून व्यवसायिकांना मोबदला देते. परंतु, मर वाढल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते. यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. परिणामतः पोल्ट्री व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागते.
उन्हाळ्याच्या दिवसांत घ्यायची काळजी
१) पक्षांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा करणे गरजेचे आहे.
२) पोल्ट्रीच्या शेडवर चुन्याचा लेप लावणे, शेडवर नारळाच्या झावळ्या किंवा गवताचे आच्छादन टाकणे गरजेचे आहे.
३) पोल्ट्री शेडमध्ये पंखा किंवा कुलर लावणे देखील गरजेचे आहे.
४) कोंबड्यांची होईल तेवढी उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.
Growth in tempreture is not good for poultry farming
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
नवीन पोल्ट्री फार्म तयार करण्यासाठी लोन मिळेल का