ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
फळ शेती

Fruit Crop Insurance | फळ पीक विमा जमा.. शेतकऱ्यांना दिलासा! ८१ कोटींचा विमा परतावा खात्यात..

Fruit Crop Insurance | Fruit crop insurance deposit.. Relief for farmers! Insurance refund of 81 crores in the account..

Fruit Crop Insurance | रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (Fruit Crop Insurance) आतापर्यंत ८१ कोटी १० लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील चार मंडलांतील शेतकऱ्यांना अजूनही परतावा मिळालेला नाही.

२०२२-२३ हंगामात जिल्ह्यातील २७ हजार ६१७ आंबा बागायतदार आणि १० हजार ७४३ काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. यावर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान यामुळे आंबा आणि काजूचे नुकसान झाले.

कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २६ हजार ९९२ आंबा बागायतदार आणि ८ हजार ४७१ काजू बागायतदार विमा परताव्यास पात्र ठरले आहेत. आंबा बागायतदारांना ७३ कोटी ५ लाख आणि काजू नुकसानीपोटी १० कोटी ५ लाख रुपये परतावा मिळणे अपेक्षित आहे.

विमा परतावा वेळेत न मिळाल्यामुळे आंबा-काजू बागायतदार संघ आणि विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता.

नव्याने सुरू केलेल्या १८ हवामान केंद्रांवर स्वंयचलित यंत्रे नसल्यामुळे विमा परताव्यास विलंब झाला होता. मात्र, विमा कंपनीने तांत्रिक दोष दूर करीत विमा परतावा देण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : Fruit Crop Insurance | हवामान आधारित फळपीक विमा योजना ! जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ…

आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ पैकी ३० मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परतावा जमा झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील चार मंडळांतील शेतकऱ्यांना अजूनही परतावा मिळालेला नाही. याशिवाय सावंतवाडीतील माडखोल मंडलाचा विषय प्रलंबित आहे.

विमा कंपनीने उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरच विमा परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत ८१ कोटी १० लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.
  • दोडामार्ग तालुक्यातील चार मंडलांतील शेतकऱ्यांना अजूनही परतावा मिळालेला नाही.
  • विमा कंपनीने उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरच विमा परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title : Fruit Crop Insurance | Fruit crop insurance deposit.. Relief for farmers! Insurance refund of 81 crores in the account..

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button