ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land | शेतकऱ्यांनो ‘या’ महत्वाच्या कागदपत्रांवरून ठरतो जमीनीचा मालकी हक्क, जाणून घ्या सविस्तर

Land | भली मोठी शेतजमीन असो वा जमिनीचा तुकडा जमीन म्हटलं की, जमिनीचा मालकी हक्क आलाच. मात्र अनेकदा या जमिनीच्या मालकी हक्कावरून मोठमोठे वाद होतात. जसा बांधावरून शेतकऱ्यांचा वाद होतो त्याचप्रमाणे जमिनीच्या (Agriculture) मालकी हक्कावरून देखील वाद झाल्याचे पाहायला मिळतात. म्हणूनच जमिनीच्या मालकी (Financial) हक्काचे पुरावे देणारे काही दस्तऐवज आहेत. या पुरावानुसार जमिनीचा (Land Ownership Proof) मालकी हक्क ठरतो. जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाल्यास शेतकरी सात पुराव्यांनी जमीन आपलीच असल्याचे सिद्ध करू शकतात. चला तर मग जमिनीच्या मालकी हक्काचे महत्वाचे पुरावे जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांनो तुम्हीही घरबसल्या महिन्याला कमावू शकता 80 हजार, जाणून घ्या ‘या’ बँकेची खास ऑफर

खरेदी खत
जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारा पुरावा म्हणजे जमीन खरेदी करताना घेतलेला खरेदी खत. कोणत्याही शेतकऱ्याकडून जमिनीचे खरेदी करताना खरेदी खत बनवला जातो. यानुसार जमिनीचा व्यवहार ठरतो. त्यानुसार शेतकरी आपल्या जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करू शकतात. या खरेदी खतावर जमीन कोणत्या तारखेला किती किमतीला खरेदी केली आहे याचा सविस्तर पुरावा दिला जातो.

सातबारा उतारा
जमिनीची मालकी सिद्ध करणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा होय. सातबारा उतारा या कागदपत्राला जमिनीचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. गाव नमुना सातमध्ये सदर शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे. ही सर्व माहिती नमूद केली जाते.

वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हवालदील शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद, म्हणाले “तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका…”

प्रॉपर्टी कार्ड
बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी पुरावा सादर करणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय. या प्रॉपर्टी कार्डमुळे सदर जमीन तुमचीच आहे हे सिद्ध होते. ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर माहिती दिली जाते तशीच माहिती या प्रॉपर्टी कार्डवर देखील दिली जाते. या प्रॉपर्टी कार्डवर जमीन किंवा इमारत यांसारख्या सर्वच मालमत्तेची नोंद केली जाते. यावर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता.

जमीन महसूलाच्या पावत्या
तुम्हाला माहीतच असेल की, दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो. हाच दरवर्षी भरल्या महसूल भरल्यानंतर तलाठी या महसुलाची पावती देतात. याच पावत्या जमिनीची मालकी आपलीच आहे हे सिद्ध करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पावत्या जपून ठेवाव्यात.

जमिनीबाबतचे जुने खटले
अनेकदा जमिनीवरून शेतकऱ्यांचे कोर्टात केस किंवा खटला चालू असतो. तुम्ही या खटल्याचे कागदपत्रे सांभाळून ठेवू शकता किंवा त्याची झेरॉक्स अथवा या खटल्याचा लागलेला निकाल हे ही कागदपत्रे जपून ठेवू शकता. हीच जमिनीचा वाद उद्भवल्यास किंवा जमिनीचा पुरावा सादर करण्याची वेळ आल्यास तुम्ही पुरावा म्हणून वापरू शकता.

जमीन मोजणीचे नकाशे
जमिनीची मोजणी करण्यासाठी जमिनीचे नकाशे काढले जातात. हेच नकाशे तुम्ही जपून ठेवल्यास जमीनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेल. जमिनीची कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली असते.


मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, ownership of land is determined by these important documents, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button