ताज्या बातम्याशेती कायदे

Property Rights | नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा पूर्ण अधिकार नसतो ; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क !

Property Rights | लग्न ( Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा सोहळा असतो. यामुळे दोन माणसांसोबत दोन कुटुंबे देखील एकत्र येतात. मात्र सगळीच लग्नं टिकतात असे नाही ! आजकाल या ना त्या कारणाने घटस्पोट होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान घटस्फोट ( Divorce) झाल्या नंतर पत्नीचा आपल्या सासरच्या संपत्तीवर हक्क असतो का ? हा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत आज आपण जाणून घेऊया.

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा पूर्ण अधिकार नसतो

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा पूर्ण अधिकार असतो, असे कायम म्हंटले जाते. मात्र हे पूर्णतः बरोबर नाही. याला देखील काही बाजू आहेत. जर सासरची संपत्ती ही पतीने स्वतः कमावलेली असेल तर त्यावर त्याच्या पत्नीचा व मुलांचा पहिला अधिकार असतो.

घटस्फोट झाल्यानंतर पत्नीकडे खालील अधिकार असतात...

1) पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. यावेळी दोघांच्या आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय घेतला जातो.

2) घटस्फोटानंतर मुले जर आईसोबत राहत असतील तर त्याची वेगळी व जास्तीची पोटगी द्यावी लागते.

3) घटस्फोट झाल्यानंतर पत्नीचा पतीच्या संपत्तीवर काही अधिकार नसतो. मात्र वारसाहक्काने मुलांचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असतो.

4) जर नवरा बायको संयुक्तपणे त्यांच्या संपत्तीचे मालक असतील तर घटस्फोटानंतर मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाते.

पतीचा मृत्यु झाल्यास महिलेचा संपत्तीवर असा अधिकार असतो…

1)पतीची संपत्ती वडिलोपार्जित असेल तर त्याच्या मृत्युनंतर त्या संपत्तीवर पत्नीचा हक्क राहत नाही.

2) पतीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला सासरचे लोक घरातून हाकलून लावू शकत नाहीत.

3) पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांना महिलेला पोटगी द्यावी लागते. महिला व तिची सासरची आर्थिक परिस्थिती यावरून पोटगी किती द्यायची हे ठरवले जाते.

4)दरम्यान विधवा महिलेने दुसरे लग्न केल्यास तिला सासरकडून पोटगी मिळत नाही.

5) पतीच्या पाश्चात महिलेला मुले असतील तर मुलांचा वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण हक्क असतो.

6) याशिवाय एखाद्या व्यक्तीचा इच्छापत्राशिवाय मृत्यू झाला असेल तर, त्याची संपत्ती त्याच्या पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Property rights for woman after divorce and death of husband

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button