ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rate | कापसाच्या भावात सुधारणा, पण अस्थिरता कायम जाणून घ्या त्यामागचं नेमक कारण

Cotton Rate | Know the exact reason for improvement in cotton prices, but volatility remains

Cotton Rate | देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काही प्रमाणात सुधारणा दिसून आली.

  • वायदे बाजारात आणि बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव (Cotton Rate) अस्थिर आहेत.
  • अमेरिकेच्या कापसाला ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या कापसामुळे फटका बसतोय.
  • साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन पुन्हा एकदा कापूस बाजारात अस्थिरता निर्माण करत आहे.

कापसाच्या भावात चढ-उतार:

  • मागील दोन आठवडे कापसाच्या भावात घसरण झाली होती.
  • आज काही बाजारांमध्ये कापसाच्या सरासरी भावात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसून आली.
  • सरासरी भावपातळी आज ७ हजार ३०० ते ७ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान होती.
  • काही बाजारांमध्ये कमाल भाव ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.
  • किमान भाव आजही ७ हजारांपासून सुरु होत आहे.

वाचा| Discount On Seeds | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बियाण्यांवर ५०% थेट सवलत!

अमेरिकेच्या कापसावर दबाव:

  • ब्राझीलमध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  • जुलैपासून येथील कापसाची काढणी सुरु होईल.
  • ऑस्ट्रेलियाचा कापूसही याचवेळी बाजारात येईल.
  • अमेरिकेचे उत्पादन घटले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव सुधारले आहेत.
  • मागणीही चांगली आहे.
  • दोन्ही देशांचा कापूस बाजारात दाखल झाल्यानंतर पुरवठा वाढेल.
  • अमेरिकेच्या वायदे बाजारात कापूस वायद्यांमध्ये पुढच्या महिन्यांतील व्यवहारांमध्ये चढ उतार दिसून येत आहेत.

एसआयएमएचे आवाहन:

  • साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशनने उद्योगांना पुन्हा एकदा चढ्या भावात कापूस खरेदी करू नये, असं आवाहन केलं.
  • केंद्र सरकार आणि सीओसीपीसी यांच्या कापूस उत्पादन अंदाजावरच विश्वास ठेवावा, कारण हे अंदाज जास्त विश्वासार्ह आहेत, असेही सांगितले.
  • सध्या कापूस बाजारात जास्त प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याने कापसाचा भाव वाढत असल्याचा दावाही या संघटनेने केला.
  • कापसाला वाढलेल्या भावात मागणी कमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

पुढील काय?

  • बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी चांगली आहे.
  • त्यामुळे दर पुन्हा पूर्वपातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे.
  • देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवल्यानंतर काही दिवस बाजारातील आवक वाढली होती.
  • पण शेतकऱ्यांकडे कापूसच कमी प्रमाणात शिल्लक असल्याने आवक पुन्हा एकदा कमी झाली.
  • कापसाची देशातील आवक पुढील काळातही कमी होत जाणार आहे.
  • निर्यातीसाठीही चांगली मागणी मागणी आहे.
  • त्यामुळे कापसाचे भाव एप्रिल महिन्यात पुन्हा सुधारू शकतात.
  • तर मे महिन्यात कापसाचा भाव सध्याच्या पातळीवरून ५ ते ७ टक्के वाढू शकतात.

Web Title | Cotton Rate | Know the exact reason for improvement in cotton prices, but volatility remains

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button