ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Market Rate | आज बाजारात काय चाललंय? पाहा कापूस, सोयाबीन, कांदा, गहू आणि हरभऱ्याचे भाव वाढले का?


Market Rate | कापूस: आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे कमी होऊन ८२.६५ सेंटवर आले होते. तर देशातील वायदे ६० हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. सीसीआयनेही आपले कापूस विक्रीचे भाव (Market Rate) कमी केले आहेत. देशातील कापसाचे भाव गेल्या तीन दिवसांमध्ये सरासरी ३०० रुपयांनी कमी आले आहेत. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात.

सोयाबीन:

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे भाव ११.७२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले होते. देशातील बाजारात मात्र आज भाव काहीसे स्थिरावले होते. सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात.

कांदा:

बाजारातील आवक मर्यादीत असतानाही कांदा भाव निर्यातबंदीमुळे दबावात आहेत. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचाही बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. सध्या भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते.

गहू:

देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात.

हरभरा:

मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढलेले आहेत. हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभऱ्याच्या भावात पुढील महीना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button