बाजार भाव
ट्रेंडिंग

Market Rates | कापूस, सोयाबीन, गहू, आले आणि लसूण यांच्या बाजारभावातील घडामोडी..

कापूस:

 • देशातील बाजारात कापसाच्या भावातील नरमाई काहीशी थांबली आहे.
 • बाजारातील आवक कमी झाली आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे वाढून ८१.७२ सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचले होते.
 • देशातील वायदे ५८ हजार ७२० रुपये प्रतिखंडीवर होते.
 • बाजार समित्यांमध्ये आज ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.
 • कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन:

 • सोयाबीन बाजारातील नरमाई अजूनही कायम आहे.
 • आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत.
 • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.
 • तर सोयापेंड ३४२ डाॅलर प्रतिटनांवर होते.
 • देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये चढ उतार सुरुच आहेत.
 • देशातील बाजारात आज सोयाबीनला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.
 • सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गहू:

 • देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे.
 • आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे.
 • सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे.
 • तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.
 • त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.
 • देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
 • गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आले:

 • आल्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये टिकून आहे.
 • आल्याचे उत्पादन यंदा घटल्यामुळे बाजारातील आवक कमी आहे.
 • तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे.
 • सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.
 • आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते.
 • तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

लसूण:

 • लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत.
 • तर बाजारातील आवक वाढत आहे.
 • मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button