ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Onion Export | मोठी बातमी! सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा तरी निर्यातदारांची मात्र कोंडी!

Onion Export | Big news! Even if the government gives relief to the farmers, the exporters are in a dilemma!

Onion Export | देशांतर्गत कांद्याची उपलब्धता आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ पासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. (Onion Export) यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कांद्याची निर्यात पुन्हा खुली करण्याची मागणी जोर धरत होती.

या मागणीला लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबाबत हालचाली सुरू केल्या. मात्र, मंत्र्यांच्या बैठका आणि चर्चा यातून निश्चित निर्णय पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते.

यातच, ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी कायम राहणार असल्याची माहिती केंद्राच्या सचिवांनी दिली. यानंतर काही दिवसांनी बांगलादेशला कांदा निर्यातीची चर्चा पुढे आली. त्यावर निर्यातदारांना थोडीशी दिलासा मिळाला होता. मात्र, उशिराने ९ दिवसांनंतर याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.

या अधिसूचनेनुसार, नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) मार्फत ५० हजार टन कांद्याची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर आता निर्यातदारांची कोंडी झाली आहे.

वाचा | PM Surya Ghar Yojna | पंतप्रधान मोदींच्या ‘या’ मोफत वीज योजनेला ला मंजुरी!

केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी शुक्रवारी (१ मार्च) याबाबत अधिसूचना जारी केली. परकीय व्यापार (विकास आणि नियमन) अधिनियम, १९९२ नुसार सुधारित परकीय व्यापार धोरण, २०२३ मधील तरतुदीनुसार केंद्र सरकारने एनसीईएलमार्फत बांगलादेशला ५० हजार टन कांद्याची निर्यातीसाठी परवानगी दिली आहे.

यापूर्वी २२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली होती की, बांगलादेश, भूतान, मॉरिशस आणि बहरिन या चार देशांमध्ये ५४ हजार ७६० टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विदेश व्यापार महासंचालनालयाने फक्त बांगलादेशमध्ये निर्यात करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, इतर देशांमध्ये निर्यात कधी सुरू होईल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

मुद्देसूद:

  • कांद्याची निर्यात ३१ मार्चपर्यंत बंद.
  • बांगलादेशला ५० हजार टन कांदा निर्यातीची परवानगी.
  • एनसीईएलद्वारे निर्यात प्रक्रिया राबवणे.
  • इतर देशांमध्ये निर्यातबाबत अद्याप अनिश्चितता.

Web Title | Onion Export | Big news! Even if the government gives relief to the farmers, the exporters are in a dilemma!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button