ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rate | शेतकऱ्यांनो कापसाला मार्चमध्ये काय भाव मिळेल? सध्या किती मिळतोय भाव? जाणून घ्या कापसाच्या दराची भविष्यवाणी

Cotton Rate | What price will farmers get for cotton in March? How much is the current price? Know Cotton Price Prediction

Cotton Rate | कापूस भावातील सुधारणा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात (Cotton Rate) काही चढ-उतार असले तरी, परिस्थिती भावाला आधार देणारी आहे. त्यामुळे देशातील भावही आणखी वाढू शकतात, असा अंदाज आहे.

 • सध्याचा भाव आणि वाढीचा अंदाज
 • देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा भाव सरासरी ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.
 • कमाल भाव ७५०० रुपयांच्या पुढे गेला आहे.
 • सरासरी भाव ७४०० रुपये देखील मिळतोय.
 • पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ होऊ शकते.
 • म्हणजेच सरासरी भाव ७५०० रुपयांची पातळी गाठू शकतो.
 • आवक
 • आज, २३ फेब्रुवारी रोजी बाजारातील आवक १ लाख १२ हजार ६०० गाठी होती.
 • कालच्या तुलनेत आवक स्थिर होती.
 • महाराष्ट्रातील बाजारातील आवक सर्वाधिक होती. राज्यात ३८ हजार ७०० गाठी कापूस आज विकला गेला.
 • देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी महाराष्ट्रातील आवक जवळपास ३५ टक्के होती.
 • गुजरातमध्येही ३६ हजार ४०० गाठी कापसाची आवक झाली होती.
 • देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी या दोन्ही राज्यांमध्येच ६७ टक्के कापूस विकला गेला.

वाचा | Namo Shetkari Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता ‘या’ तारखेला येणार खात्यावर

 • आंतरराष्ट्रीय बाजार
 • आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज पुन्हा ९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.
 • रुपयात हा भाव १६ हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल होतो.
 • देशातील वायदे ६० हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते.
 • क्विंटलमध्ये हा भाव १६ हजार ९०० रुपये होतो.
 • म्हणजेच वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात कापसाचे भाव समान पातळीवर आले.
 • कॅटलूक ए इंडेक्स
 • कॅटलूक ए इंडेक्स म्हणजेच जागतिक बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भाव १००.५० सेंटवर पोचला होता.
 • म्हणजेच १ डॉलरवर.
 • रुपयात हा भाव होतो १८ हजार 400 रुपये प्रतिक्विंटल.

देशातील प्रत्यक्ष रुईचे भाव:देशातील बाजारात प्रत्यक्ष रुईचे भाव ५७ हजार ते ५८ हजार प्रतिखंडीवर होते.
सरासरी ५७ हजार ५०० रुपये भाव गृहीत धरला तर क्विंटलचा भाव होतो १६ हजार १५० रुपये.

Web Title | Cotton Rate | What price will farmers get for cotton in March? How much is the current price? Know Cotton Price Prediction

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button