Today’s Market Update | अर्रर्र..! सोयाबीनचे दर पुन्हा दबावात; पण तुरीचे दर सुसाट, जाणून घ्या ताजे बाजारभाव
Today’s Market Update | सोयाबीनचे दर हंगामभर दबावात असतानाच तुरीच्या दरात (Today’s Market Update) मात्र सातत्याने वाढ होत आहे. सध्या तुरीला १२ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. परंतु सोयाबीनला पाच हजार रुपयांचाही पल्ला गाठता आलेला नाही.
सोयाबीनचे दर | Soybean rates
सध्याचे दर ४१५१ ते ४६५० रुपये प्रति क्विंटल आहेत. तर गेल्या आठवड्यातील दर ४२०० ते ४६४२ रुपये प्रति क्विंटल होते. यंदाच्या हंगामातील अपेक्षित दर ५००० रुपये प्रति क्विंटल होते.
तूरीचे दर | Tur Rates
सध्याचे दर ९९०० ते १२१०२ रुपये प्रति क्विंटल आहेत. तर गेल्या आठवड्यातील दर ९५०० ते १२००० रुपये प्रति क्विंटल होते.
वाचा: आज रामनवमीच्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार विशेष लाभ; लगेच वाचा तुम्हाला देणार का नशीब साथ?
नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची आवक सरासरी ८०० क्विंटल आणि तुरीची आवक ८७४ क्विंटल आहे. तांदळाला ३५०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. टरबूज, टोमॅटो, वांगे, आणि लाल मिरचीचे दरही बदलले आहेत. चांगल्या प्रतीच्या संत्रा फळांना ४००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
शेतकऱ्यांची अस्वस्थता:
सोयाबीनचे दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तुरीचे दर चांगले असले तरी त्याची आवक कमी आहे.