जॉब्स

Police Bharti |आनंदाची बातमी! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Good news! Maharashtra Police Recruitment Application Deadline Extended; Apply by 'this' date

मुंबई: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र, मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास (Police Bharti)विलंब होत असल्याने राज्य सरकारने ही मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा मिळेल.

अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक(Police Bharti) अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र, कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता:

  • महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस (Police Bharti) भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
  • SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात-वैधता प्रमाणपत्र
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
  • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
  • पोलीस पाल्य प्रमाणपत्र
  • अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
  • अंशकालीन प्रमाणपत्र
  • इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र
  • NCC प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button