ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy on Fertilizer | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार करणार खतांवरील अनुदानात वाढ?

आपला भारत देश हा कृषी प्रदान देश आहे. देशातील तब्बल 65 नागरिक हे आपला उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर करतात.

Subsidy on Fertilizer | यामुळेच शेतकरी शेतीत (Agriculture) खूप कष्ट करतात. जेणेकरून त्यांचे पीक चांगले येईल आणि त्यांना त्यातून चांगला आर्थिक नफा मिळेल. परंतू, अनेकदा हातातोंडाशी आलेला खास नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disasters) तर अनेकदा पिकाला भाव न मिळाल्यामुळे मातीमोल होतो. वाढती महागाई शेतकऱ्याला सहन करावी लागते. आज-काल बियाणं (Seeds), मशागती (Cultivation) यासाठी देखील प्रचंड पैसा लागतो. ज्यामध्ये आणखी भर आहे ती खतांची (Fertilizer). आता शासनाकडून (Goverment) शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकांवर मिळणाऱ्या खतांवरील अनुदानात (Subsidy on Fertilizer) शासन वाढ करू शकते.

मोदी सरकारने घेतला खतांवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय?
बुधवारी (27 एप्रिल) मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत खतांवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा यावर बातचीत करण्यात आली. अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांना उपलब्ध खतांच्या किमती वाढणार नाहीत आणि त्यांना जुन्या किमतीत खत मिळू शकण्याची शक्यता आहे.

वाचा: Online Crop Loan | पिक कर्जाचे ऑनलाईन अर्ज सुरु, पात्र शेतकर्‍यांना मिळणार 15 दिवसातच कर्ज, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

‘यामुळे’ झाला खतांच्या किमतीवर परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षी जानेवारीपासून खताच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतातील खत आयातीवरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सरकारने अर्थसंकल्प सादर करताना खतांवरील अनुदानातही मोठी कपात करण्याची घोषणा केली होती.

वाचा:Agriculture | महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्री करणं झालं कठीण, आता ‘या’ नियमांना तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही, जाणून घ्या नवे नियम

यंदा भासणार नाही खतांची कमतरता?
त्याचबरोबर यावर्षी प्रतिकूल जागतिक परिस्थिती असून देखील खतांच्या बाबतीत कमतरता भासणार नाही. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्याचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी खरीप हंगामाकरता जवळपास 354 लाख टन खताची आवश्यकता असेल. परंतु, तरी देखील या खताची उपलब्धता जवळपास 485 लाख टन इतकी असेल. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button