कृषी बातम्या

आता रब्बी पिकांचे बियाणे कृषी विद्यापीठात उपलब्ध होणार; बियाणे हवे आहेत? तर लगेच “या” नंबर वरून बियाणांची नोंदणी करा..

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी “कृषी विद्यापीठाचे” (University of Agriculture) बियाणे विकत मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र (Departmental Center for Agricultural Extension Education) औरंगाबादचे रामेश्वर ठोंबरे यांनी ही माहिती दिली.

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबादचे रामेश्वर ठोंबरे –

शेतकऱ्यांची बियाणे (Farmers’ seeds) गरज काही प्रमाणात का होईना भागवली जाते. मागील चार वर्षांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (University of Agriculture) मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी थोड्या प्रमाणात का होईना, ज्या त्या जिल्ह्यातील विद्यापीठाच्या केंद्रात (At the university center in the district) बियाणे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक अथवा दोन बॅगसाठी खूप लांबच प्रवास करावा लागत नाही.

हे ही वाचा –

रब्बी पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाईल –

विद्यापीठ बियाण्यास मोठी मागणी होत असते. या रब्बी हंगामात ज्वारी, करडई, हरभरा, जवस या रब्बी पिकांचे बियाणे (Seeds of rabi crops) उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे बीज प्रक्रिया केंद्राचे प्रमुख (Head of Seed Processing Center) डॉ. एस. बी. घुगे यांनी
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र (Departmental Agricultural Extension Education) पैठण रस्ता, औरंगाबाद कार्यालयास पत्राद्वारे कळविले असल्याचे सांगितले आहे.

बियाणे आणि दर स्थिती –

ज्वारी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती – बॅग ४ किलो – प्रतिबॅग ३२० रुपये, हरभरा बिडीएनजी ७९७ – १० किलो वजन पिशवी – ८०० रुपये, काबुली बिडीएनजीके ७९८ – १० किलोची पिशवी – १००० रुपये, करडई- पी. बी. एन. एस. १२ (परभणी कुसुम), पी. बी. एन. एस. ८६ ( पूर्णा) – ५ किलो – ५०० रुपये, जवस – लातूर ९३ – ५ किलो – ५०० रुपये.

बियाणे मागणीसाठी नोंदणी –

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र पैठण रोड (बियाणे विक्री केंद्र) (Seed sales center) औरंगाबाद येथे बियाणे मिळेल. शेतकऱ्यांनी रामेश्वर ठोंबरे ९४२०४०६९०१ या व्हाट्स क्रमांकावर बियाणे मागणी नोंदवू शकतात. अशी माहिती शेतकऱ्यांना दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button