मोदी सरकारने निर्माण केलेली “ई-नाम ” नेमके आहे तरी काय? शेतकऱ्यांना त्यापासून काय लाभ होणार?
What exactly is the "e-name" created by the Modi government? How will farmers benefit from it?
संपूर्ण देश संपूर्ण देश एक बाजारपेठ म्हणून विकसित व्हावा महाराष्ट्रातील माणसाला दिल्लीमध्ये शेतमालाची खरेदी विक्री करता यावी तसेच शेतकरी व खरेदीदार यांच्यातील दलाली प्रकार संपुष्टात यावा या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने 2016 साली इ -नाम ची स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच इ नाम स्थापनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत ,आतापर्यंत राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच इ- नाम 585 कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. आता त्याला अजून विस्तृत करण्याचे काम देखील सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यानिमित्त ई-नाम पोर्टलचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली. या इ-नाम पोर्टलचा शेतकऱ्यांना निश्चितच द्वीगुनित फायदा होणार आहे.
ही योजना लागू शेतकऱ्यांकडून राबवली जाते तसेच व्यापारी वर्गाचा देखील यामध्ये समावेश होतो. भारतामध्ये एकूण २७०० बाजार समित्या व ४००० उपबाजार आहेत.
👉इ-नाम म्हणजे नक्की नेमके काय?
2016 साली नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे शेतीच्या मालाची विक्री पद्धती आधुनिक किंवा तांत्रिक पद्धत व्हावी याअंतर्गत शेतकरी कुठल्याही वस्तू चांगल्या किमतीवर नोंदणी करून विक्री करू शकतात.त्याच्या मालाला चांगली किंमत मिळण्यासाठी एक प्रकारची मंडी उपलब्ध करून दिली आहे.
👉यावर कोणत्या नवीन सुविधा मिळणार आहेत
इ नाम च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हवामान अंदाज, पीक सल्ला, पिकाची कापणी कधी करावी अशा सर्व प्रकारची माहिती या पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे.. ई-नाम पोर्टलवर आतापर्यंत 1.70 कोटी शेतकरी आणि 1.63 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे.
👉नोंदणी कशी कराल?
१) प्रथम या www.enam.gov.in जावे.
२) तिथे गेल्यानंतर नोंदणी साठी अर्ज करावा.
३) शेतकरी नावाचा एक पर्याय दिसेल तिथे स्वतः ईमेल आयडी द्यावा त्यावर पासवर्ड येईल
आपण आपल्या केवायसी कागदपत्रांद्वारेन www.enam.gov.inया वेबसाईटवर अर्ज करून आपल्या डॅशबोर्डवर नोंदणी करू शकता.