कृषी सल्ला

सोयाबीनचे दर सात हजार पर्यंत !पहा : पुढील हंगामासाठी “अशी करा” हाताळणी व साठवणूक…

Soybean prices up to 7,000! See: "Do it" handling and storage for next season

खरीप हंगामाचा आता जवळजवळ शेवट होत आला आहे. अद्याप ही काही पिकांची बाकी आहे ,परंतु यावर्षी तूर ,हरभरा बरोबरच सोयाबीनचे दर आला आहे. त्यामुळे सोयाबीनची लागवड करण्याकरिता बियाणे कदाचित महाग होऊ शकते म्हणून कृषी मंत्री यांनी देखील घरच्या बियाण्यांचा उपयोग करण्याचे सूचित केले होते. सोयाबीन लागवड करताना काय उपाययोजना करता येईल हे आपण पाहुयात

👉सोयाबीन लागवड करताना दर वर्षी बियाणे बदलण्याची गरज लागत नाही ,लागवडीकरता आपण प्रमाणित बियांचा उपयोग करू शकतो यामुळे खर्च खर्चात बचत होऊ शकते.

👉सोयाबीनचे उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास त्यामध्ये पिकाची कापणी, मळणी, बाजाराची विक्री पद्धत, साठवणूक पद्धत या गोष्टी बाजार भाव मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यासाठी शेतकर्‍याने

📍खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

१) मळणी
मळणी यंत्र आणि करताना विशेष लक्ष देण्याची गरज आहे बियांचे आद्रता 14 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असूनही तसेच मळणी सोयाबीनची डाळ होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याकरता मळणी चे यंत्र म्हणजेच आरपीएम मिनिटाला साडेतीनशे ते चारशे पर्यंत मर्यादित ठेवावे.

२) हाताळणी
बियाणे एकसारखे ताडपत्रीवर पसरून त्यामधील खडे, गाड्या, कचरा, माती चाळणीच्या साह्याने स्वच्छ करावी. ग्रॅविटी ग्रेन तसेच स्पेयराल पॅरेट चा देखील वापर करू शकता. बियाने करताना जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, त्याची वाहतूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, त्याची जास्त आदळ आपट होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

३) साठवणूक
किमान 70 टक्के उगवण्याची शक्ती असणारे बियाणे साठवणूक करताना उपयुक्त ठरेल. बियाण्यांची योग्य पद्धतीने साठवणूक करावी. साठवणूक करताना बियांची आद्रता आठ ते दहा टक्के पर्यंत असावी सहा टक्के पेक्षा कमी आद्रता असल्यास बी उगवण्यावर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्याकरता मोत्याचा किंवा बारदान याचा उपयोग करावा.

साठवणूक करण्याची जागा ही कोरडी असावी.साठवणुकीच्या वेडी बियाण्यांची फार मोठ्या प्रमाणात थप्पी लागू नये त्यामुळे खालील पोत्यातील बिया फुटून त्यातील उगवण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. थप्पी लावताना खेळती हवा कशी राहील याकडे लक्ष द्यावे तसेच उंदरांचा प्रादुर्भाव होणार नाही ,याकडे देखील लक्ष द्यायला हवे.

हे देखील वाचा


१) “अशी करा” सुगंधित गवताची लागवड आणि मिळवा भरघोस उत्पन्न


२) पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्यास हे करा

३) खाद्य तेलाच्या किमतीत वाढ! का इतक्या खाद्य तेलाच्या किमती वाढलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button