ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शेती कायदे

Yojana | नैसर्गिक आपत्तीस आता शासनाचीच साथ! शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक सहाय्य

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा यायचं म्हटलं की शेतकरी राजा आनंदात असतो कारण पावसामुळे त्याचं पीक (Crop) बहरत. परंतु पावसाळ्यात (Rain) समप्रमाणातच पाऊस पडेल असं नसतं.

Yojana | कारण पावसाळ्यामध्ये अनेकदा नैसर्गिक आपत्ती (Natural disaster) ओढावतात. अतिवृष्टी, महापूर, हवामान बदल, भूकंप, वीज कोसळणे यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके (Crop Destroyed) मातीमोल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका (Economic blow) सहन करावा लागतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा फटका बसू नये यासाठी कायमस्वरूपी त्यांना अर्थसहाय्य (Financial aid) देण्यात यावे यासाठी या कायमस्वरूपी योजनेला शासनाकडून 1983 मध्ये मंजुरी देण्यात आली. या योजनेचा फायदा शेतकरी कायमस्वरूपी घेऊ शकणार आहेत.

योजनेअंतर्गत नुकसानग्रस्तांना कसा मिळेल लाभ?
अतिवृष्टी, महापूर, हवामान बदल, भूकंप, वीज कोसळणे यांसारख्या समस्येने शेतीतील नुकसान झाल्याने जे शेतकरी बाधित होतील त्यांना शासनातर्फे या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत शेती पिके आणि फळबागांसाठी 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यास प्रतिहेक्टरी एक हजार रुपये इतकी आर्थिक मदत प्रदान केली जाते. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेचा लाभ दोन हेक्टर जमिनीपर्यंत घेऊ शकतात.

वाचा: पेट्रोलची चिंताच मिटली! केवळ एका रुपयात ‘ही’ स्कूटर धावणार 5 किलोमीटर, फक्त 10 हजारांत घेऊन या घरी

पात्रता

• भात, गहू, बाजरी, ज्वारी, तूर यांसारखी इतर कडधान्य व तेलबिया यांचे या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे 50% पेक्षा अधिक नुकसान झाल्यास त्यांना एक हजार रुपयांची मदत मिळते. तर शेतकरी दोन हेक्टरपर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतात.
• योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत फळबागा पडल्यानंतर त्यांच्या पुनर्लागवडीसाठी अनुदान दिले जाते.
• तर ज्या फळबागांचे उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा गळले असेल त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक हजार रुपये अर्थसाहाय्य केले जाते.
• त्याचबरोबर फळबागांच्या फांद्या फासटने किंवा तुटने आणि झाडांची उत्पादन क्षमता कमी होणे. अशा फळबागांना पुनर्जीवन देण्यासाठी प्रतिहेक्टरी 1000 रुपये इतके अर्थसहाय्य केले जाते.

वाचा: शेतकऱ्यांनो तुमच्याकडे गाय-म्हशी आहेत, तर तुम्हालाही मिळू शकतो दीड लाखांचा फायदा, कसा तो जाणून घ्या सविस्तर

योजनेअंतर्गत कसे केले जातात लाभार्थी मंजूर?

• या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन एक अर्ज तलाठ्यांकडे लिखित स्वरूपात सादर करावा लागतो. त्याचवेळी शेतकऱ्यांनी सातबारा देखील देणे अनिवार्य आहे त्यानंतर तलाठ्याकडून याची पोच घ्यावी.
• यानंतर तलाठ्यामार्फत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा.
• तीन आठवड्यांच्या आत तलाठ्यांकडून हा पाठपुरावा तहसीलदारांकडे हस्तांतरित/ सादर करणे अपेक्षित आहे.
• यानंतर तलाठ्याने पिकांच्या नुकसान अहवालाची प्रत (झेरॉक्स) जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे एक महिन्याच्या आत सादर करावी.
• तलाठ्याने क्षेत्रनिहाय, पीकनिहाय 50 % पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे वेगळे अहवाल तयार करावे. त्यानंतर एक प्रत (झेरॉक्स) कृषी आयुक्त / विभागीय आयुक्त यांना पाठवावी.

अशाप्रकारे या शासन निर्णयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button