Property Rules | अल्पवयीन मुलांच्या नावावरची मालमत्ता विकता येते का? जाणून घ्या काय सांगतो कायदा?
Property Rules | 18 वर्षांखालील मुलांच्या नावाची जागा किंवा जमीन विकत(Property Rules) घेणे किंवा विकणे कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा मालमत्तेची विक्री करण्यासाठी, न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता:
जर एखादी मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल आणि त्यात संबंधित व्यक्तीचे नाव असेल तर ती मालमत्ता विकता येते.
आजारपणामुळे विक्री:
जर एखादी व्यक्ती आजारपणामुळे खरेदी किंवा विक्रीसाठी येऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
न्यायालयाची परवानगी:
आर्थिक अडचणींमुळे अनेकदा जमीन किंवा जागा विकण्याची गरज असते. अशा परिस्थितीत, जर त्या जागेवर अल्पवयीन मुलांची नावे असतील तर न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. न्यायालयात अर्ज करून आणि योग्य पुरावे सादर करून परवानगी मिळू शकते. विक्री केलेल्या मालमत्तेतील काही रक्कम अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी ठेवणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांची नावे उताऱ्यावर असल्यास:
जर अल्पवयीन मुलांची नावे उतार्यावर असतील आणि विक्रेत्याचे नावही उतार्यावर असेल तर न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
- वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता वारशाने मिळाल्यास आणि त्यावर मुलांची नावे असतील तर मृत व्यक्तीची पत्नी किंवा ज्यांची नावे आहेत ते ती मालमत्ता विकू शकतात.
- स्वतः खरेदी केलेली आणि अल्पवयीन मुलांच्या नावाची मालमत्ता विकायची असल्यास न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
- अल्पवयीन मुलाचा सांभाळ करणारे नातेवाईक जमीन-जागा विकायची असल्यास त्यांनाही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल.
- ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेता येते.
हेही वाचा: दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; लगेच वाचा गुडन्यूज
अधिक माहितीसाठी:
- मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
- महाराष्ट्र नोंदणी कायदा, 1961