ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याशेती कायदे

गावातील ‘ही’ कामे नडली तर घ्या तलाठ्याची भेट ! मग सगळी सरकारी काम होणार एकदम थेट ; पहा तलाठी नक्की कोणती कामे करतात…

सर्वसाधारणपणे सर्व स्तरातील लोकांना वाटते की, तलाठीच महसुलाची सर्व कामे करतात पण त्यांच्याकडे नक्की कोणती कामे आणि अधिकार सोपवलेली असतात हे आपल्या शेतकरी बांधवांना माहीत असणे गरजेचे आहे. यामुळेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी नेमकी कोणती कामे (Law) करतात हे जाणून घेणार आहोत. यामुळे आपल्यासाठी तलाठी नेमकी कोणती कामे करतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा. नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय आपला यू ट्यूब (Youtube Video) चॅनल ज्याचं नाव आहे मी E शेतकरी…

तलाठी करत असलेल्या कार्यक्षेत्राला सज्जा म्हटल जात. 1 ते 4 गावांचा मिळून तलाठी सज्जा झालेला असतो. जमीन महसूल अधिनियम 1966 (Land Revenue Act 1966 )अंतर्गत असणाऱ्या नियमांनुसार तलाठ्यांना वेगवेगळी कामे करावी लागतात. तहसीलदार यांच्या मार्फत तलाठी या कर्मचाऱ्याची निवड केली जाते.

येथे क्लिक करून विडिओ पहा

तलाठी करत असणारी कामे –
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत जमीन महसूलाचे गाव पातळीवरील अभिलेख ठेवणे आणि ते अभिलेख अद्ययावत करणे हे तलाठ्याने पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. तसेच जमीन महसूलाची थकबाकी व इतर वसूली योग्य आणि त्यांचे अभिलेख ठेवणे हे तलाठ्याचे दुसरे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ‘अ’ पत्रकानुसार आणि इंडेक्स-२ अनुसार खरेदीखताची नोंद, आणि फेरफार गावनमुना नं. ६ मध्ये घालणे तसेच सर्व संबंधितांना नोटिसा (Notice) पाठवणे आणि नंतर नोंद फेरफार नोंदीप्रमाणे सात-बारा दुरुस्त करणे..याचसोबत आपल्याकडे आलेल्या अर्जावरून वारसांची नोंद वारस रजिस्टरला करून घेणे व वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव फेराव नोंद मंजूर झाल्यावर सात-बारावर नोंद करून घेणे. पिकांची पाहणी करणे. याचसोबत जमीन मालकाव्यतिरिक्त अन्य वहिवाट आढळल्यास वहिवाट सदर कोरे ठेवून, फॉर्म नं. १४ भरून तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व दाखले, उतारे देणे. इत्यादी कामे तलाठी करतात.

तलाठी करू शकत नसलेली कामे-
आता तलाठी नेमकी कोणती कामे करू शकत नाहीत हे आपण पाहूया…..कोणतीही फेरफार नोंद मंजूर किंवा ना मजूर करण्याचे अधिकार तलाठ्यास नसतात. मंडल अधिकाऱ्यांचा तो अधिकार असतो. तलाठी आणेवारी लावू शकत नाहीत, ते अधिकार तहसीलदार यांनाच असतात. तलाठी जमिनीचे खातेफोड करत नाहीत. हेअधिकार महाराष्ट्र महसूल कोड १९६६ प्रमाणे तहसीलदार यांना असतात. तसेच पीक पाहणी सदरी मूळ मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या नावे पीक पाहणी लावण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. नवीन शर्त कमी करण्याचे अधिकार तलाठ्यास नासतात. सात-बारावरील कोणताही फेरबदल डा आदेश / दस्तावरून व फेरफार नोंद मंजूर झाल्यावरच केला जाणे हे तलाठ्यावर बंधनकारक असते. याव्यतिरिक्त केलेला कोणताही फेरबदल बेकायदेशीर असतो व त्याविरुद्ध तक्रार दाखल करता येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button