ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याशेती कायदे

Property Law| वारस असूनसुद्धा बऱ्याचदा ‘या’ कारणांमुळे मिळत नाही मालकीहक्क !

Property Law|वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मालकी हक्क मिळवण्यावरून अनेकदा वाद होतात. खरंतर वडिलोपार्जित संपत्तीत वारसाहक्काने मालकी मिळते. मृत्यूपत्र, वारसपत्र किंवा हक्कसोड पत्राद्वारे ही मालकी मिळवली जाते. मात्र बऱ्याचदा वारस असून देखील तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मालकीहक्क ( Rights) मिळत नाही.

होय ! हे खरे आहे. कायद्यात याबाबत माहिती आहे. कायद्यानुसार काही प्रसंग असे आहेत, ज्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचा वारस अथवा कुटूंबातील सदस्य असून सुद्धा तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळू शकत नाही. जाणून घेऊयात त्या प्रसंगांबद्दल…

वाचा: स्त्री संपत्तीमध्ये असतात ‘हे’ अधिकार ; मुलगी आणि सून म्हणून दोन्हीकडे असतो हक्क ! जाणून घ्या अधिक

१) एकत्र कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने स्वत:हून मालमत्ता कमावून त्याच्या हयातीत ती इतर कुणाला विकली असेल, कुणाला बक्षीस दिली असेल अथवा मृत्युपत्राने दिली असेल अशा व्यक्तीच्या वारसाला मालमत्तेत हिस्सा मागता येत नाही.

२) जर एखादी वडिलोपार्जित मालमत्ता कायदेशीर गरजांसाठी, मालमत्तेच्या फायद्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी विकली असेल तर त्या मिळकतीवर कुटुंबातील सदस्य हिस्सा मागू शकत नाहीत.

३)एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांचा खून केला असेल किंवा खुनास मदत केली असेल तर त्याला आपल्या आईवडीलांच्या संपत्तीमध्ये तो हिस्सा मागू शकत नाही. खून करणारा वारस अस्तित्त्वात नाही असे समजून यावेळी मिळकतीचे वाटप करण्यात येते.

४) हिंदू धर्मात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला असेल तर, त्या व्यक्तीच्या सदस्यांना दुसऱ्या धर्माचे अपत्य समजले जाते. त्या अपत्यांना हिंदू कुटूंबातील मालमत्तेचा हिस्सा मिळत नाही.

५)एकत्र कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्याला मिळणाऱ्या मालमत्तेतील वाटा स्वखुशीने कोणासाठी सोडला असेल आणि त्यासाठी त्याने हक्कसोड पत्र केले असेल. तर, अशा सदस्याला व त्याच्या अपत्यांना मालमत्तेत हिस्सा मिळत नाही.

६) एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपला भविष्यात सांभाळ करेल अशा अश्वासनावर मुलांना किंवा नातेवाईकाला स्वतःची मालमत्ता बक्षीसपत्र म्हणून दिली असेल. मात्र संबंधित व्यक्तीने त्या वृध्द व्यक्तीचा सांभाळ न केल्यास वृद्ध व्यक्ती ती मालमत्ता पुन्हा आपल्या नावावर करू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Why sometimes people not get rights in family property

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button