ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याशेती कायदे

Property Law | स्त्रियांना संपत्तीमध्ये असतात ‘हे’ अधिकार ; मुलगी आणि सून म्हणून दोन्हीकडे असतो हक्क ! जाणून घ्या अधिक

Property Law |संपत्ती आणि त्यावरील मालकी हक्क यावरून अनेक ठिकाणी वाद होतात. सध्याच्या काळात सन्मान व प्रसिद्धी याला फार महत्त्व आहे. जर संपत्ती असेल तर सन्मान आणि प्रसिद्धी मिळते. यामुळे लोकांचा संपत्ती साठवण्यासाठी आणि त्यावर मालकी हक्क मिळवण्यासाठी खटाटोप सुरू असतो. दरम्यान आधीच्या काळात फक्त पुरुषांचाच संपत्तीवर अधिकार होता.

स्त्री व पुरुष यांना सर्व अधिकार सारखे आहेत.

मात्र आता काळ फार पुढे आलाय. समाजात वैचारिक क्रांती झाली आहे. स्त्री पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून काम करतात. स्त्रिया व पुरुष यांना सध्या समान अधिकार आहेत. संपत्तीमध्ये देखील स्त्रियांना समान हक्क असतो. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा त्यांच्या संपत्तीवर हक्क असतो. तर, सासरी नवऱ्याच्या पश्चात संपत्तीवर सुनेचा हक्क असतो.

वाचा: ‘हे’आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकावर?

मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार आहे

हिन्दू उत्तराधिकार अधिनियम, २००५ नुसार मुलींना व सुनेला संपत्तीमध्ये अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आला आहे व सुनेला सासरच्या प्रॉपर्टीमध्ये नवऱ्याच्या शेअरद्वारा प्रॉपर्टीवर हक्क मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार आहेत. मात्र सुनेला ठराविक अधिकार आहेत.

संपत्तीमध्ये मुलीचा हक्क

मुलीचा आपल्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर (Parents Property) समान हक्क असतो. मुलगी जरी विवाहित असली किंवा विधवा असली तरी तिला तिच्या आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क असतो. परंतु, वडिलांनी वारसपत्रात मुलीचे नाव लिहिले नसेल तर तिला संपत्तीत अधिकार मिळत नाही.

संपत्तीमध्ये सुनेचा हक्क

खरतर सासरकडील संपत्तीमध्ये सुनेचा कुठलाच अधिकार नसतो. मात्र आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्यासाठी ती दावा करू शकते. दरम्यान सासू सासऱ्यांच्या वारसपत्रात कुणाचेच नाव नसेल आणि मुलाचा मृत्यु झाला असेल तर ती संपत्ती सुनेच्या नावावर होते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Details about property rights for woman

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button