ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ram Mandir | 84 सेकंदाचा शुभक्षण; फक्त 5 जणांचा प्रवेश; कोण आहेत ते खास 5? अयोध्येच्या भूमितीवर रामलल्लाचा ‘पुनर्जन्म’ होणार!

Ram Mandir | 84 second lucky charm: only 5 people enter; Who are the special 5? Ramlalla will be 'reborn' on the geometry of Ayodhya!

Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला देशभरातून लाखो लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे (Ram Mandir ) मंदिर परिसर सजवला जात आहे.

मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाचच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मंदिराचे मुख्य पुजारी यांचा समावेश आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन करण्यात आले आहे. मूर्तीची निवड करण्यापासून ते ट्रस्टच्या बैठकीच्या आयोजनापर्यंतची प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध केली गेली आहे.

वाचा : Grain Online Market | अमेझॉन आणि डी मार्ट वर विक्री… तृणधान्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन बाजार; ! शेतकऱ्यांसाठी मुंडेंची ‘डबल धमाका’ सूत्रे!

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी फक्त 84 सेकंदाचा अति सुक्ष्म मुहूर्त आहे. हा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदाचा असेल. या शुभ मुहूर्ताचा क्षण फक्त 84 सेकंदाचा आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची संपूर्ण जगभरातून प्रतिक्षा केली जात आहे. हा सोहळा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण असेल.

Web Title | Ram Mandir | 84 second lucky charm: only 5 people enter; Who are the special 5? Ramlalla will be ‘reborn’ on the geometry of Ayodhya!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button