ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

ब्रेकींग! गायरान जमिन अतिक्रमणाबाबत हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत स्थगिती

High Court | सामान्यांना गरीब वर्गातील कुटुंबीयांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे गायरान जमिनीवरील अतिक्रमण. शेतकरी (Agriculture) आणि सामान्यांचे या निर्णयावर लक्ष लागून राहिले होते. या अतिक्रमणासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिलासादायक निर्णय घेतला आहे.

वाचा: तुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

गायरान जमिनीवरील अतिक्रमण
गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आले होते. परंतु, या निर्णयामुळे सर्वमान्य नागरिक बेघर होतील यामुळे या निर्णयावर सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. ज्यावर आता पुन्हा एकदा दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे.

बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विहिरींसाठी ‘इतक्या’ लाखांचं वाढीव अनुदान, शासनाकडून अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

‘या’ तारखेपर्यंत स्थगिती
आता गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी 6 डिसेंबर 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेच्या शेवटी घेण्यात आला होता. आता राज्य सरकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांवर मुंबई हाय कोर्टाकडून देण्यात आलेली आता स्थगिती 24 जानेवारी 2023 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे सामान्य गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य, त्वरित घ्या लाभ

2 लाख कुटुंबीयांना दिलासा
राज्यातील जवळपास 2 लाख 22 हजार 382 नागरिकांची घरे शासनाच्या गायरान जमिनीवर वसलेली आहेत. मात्र, या गरीबांची घरे निष्कासित करणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी गावठाणचे पट्टे तयार करता येतील का? याबाबत चाचपणी करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गाव आणि शहराजवळील गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे राहून आपले पोट भरणाऱ्या निराधार नागरिकांनी घरे बांधली आहेत. ज्यातील अनेक नागरिकांना राहायला स्वतःच्या मालकीची जागासुद्धा नाहीये. याच कारणास्तव गायरान जमिनीवरील अतिक्रमण न काढण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता, जाणून घ्या हवामान आधारित पीक निहाय कृषी सल्ला

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! High Court’s Comforting Decision on Gayran Land Encroachment; Adjournment till date

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button