ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Covid Shield | सीरम इन्स्टिट्यूट चे अजब स्पष्टीकरण:  कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण!

Covid Shield | न्यायालयात ‘दुष्परिणाम’ कबुलीनंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाने लस विक्री थांबवली, भारतातही सीरम इन्स्टिट्यूटने दिले स्पष्टीकरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यानंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरातील त्यांची लस विक्री थांबवत असल्याचे जाहीर केले आहे.

भारतातही ही लस सीरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेकासोबत मिळून तयार केली होती. आता सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे म्हणणे काय?

  • डिसेंबर २०२१ मध्येच लसीचे उत्पादन थांबवले होते.
  • लसीचे सर्व दुष्परिणाम त्याच्या पाकिटांवर लिहिले होते.
  • २०२१ आणि २०२२ मध्ये लसीकरण मोहिमेची गती कमी झाल्यामुळे उत्पादन थांबवले.
  • सुरुवातीपासूनच पॅकेजिंगवर थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) आणि थ्रोम्बोसिससह सर्व दुर्मिळ दुष्परिणामांबाबत माहिती दिली होती.

लोक काय म्हणतात?

  • टीटीएस आणि इतर दुर्मिळ दुष्परिणामांमुळे मरण पावलेल्यांचे कुटुंबिय लसीकरण मोहिमेदरम्यान याबाबत माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोप करतात.
  • लसीचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नव्हती.

पुढे काय?

  • भारतात कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता.
  • कोव्हिशिल्डचा अधिक वापर झाला होता.
  • या प्रकरणामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Serum Institute’s Weird Explanation: CoviShield Vaccine Side Effects Are Frightening People!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button