ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton Rates | कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत ; आहे त्या दरात विकावा लागतोय कापूस ! आर्थिक गणितही कोलमडले

Cotton Rates|कापसाला पांढरे सोने (White gold) असे म्हंटले जाते. मागील काही महिन्यांत पावसाला कसलाच दर नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. एकेकाळी सोन्याच्या भावाशी स्पर्धा करणारा कापूस सध्या बाजारात कवडीमोल दराने विकला जातोय. बाजारात कापसाचा दर सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटल सुरू आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला

काहीही झाले तरी कापसाला योग्य भाव आल्यानंतर कापूस विकायचा यावर शेतकरी ठाम होते. शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी तब्बल चार महिने घरातच कापूस घरातच साठवून ठेवला होता. मात्र तरीदेखील बाजारात कापसाच्या दराला सात हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत मिळालेला नाही.

कापूस दर आता दर ७ हजारच्या आसपास

यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कापूस विकायला सुरवात केली असून बाजारात आहे त्याच भावाने व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे.
मागच्या वर्षी दहा हजाराच्या पुढे असणारा कापूस दर आता दर ७ हजारच्या आसपास आहे. यामध्ये भाव वाढीची वाट बघून शेतकऱ्यांनी आहे त्या भावात कापूस विकायला सुरुवात केली आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

६-७ महिन्यांपासून कापसाचे भाव स्थिर

मागील वर्षी राज्यात कापसाला सुमारे ९ ते १० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी देखील याच भावाची अपेक्षा होती. परंतु, मागील सहा महिन्यापासून कापसाचा भाव वाढलेला नाही. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस या भावात न विकता तो साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील सहा महिन्यापासून हे भाव सहा ते सात हजार रुपयांवर स्थिर आहे.

उन्हामुळे कापसाच्या वजनात घट

आता लवकरच नवीन खरिपाचा हंगाम सुरू होतोय. यंदाच्या वर्षी अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बँक, सेवा सोसायटी, व्यापारी तसेच उसनवारी यांची परतफेड केलेली नाही. अशातच शेतकऱ्यांना नवीन हंगामातील बी-बियाणे, खतांसाठी पैसे लागणार आहेत. तसेच वाढत्या उन्हामुळे कापसाच्या वजनात घट देखील झपाट्याने होत आहे. म्हणून शेतकरी आहे त्या भावात कापूस विकून मोकळे होत आहेत .

Farmers are facing financial crisis due to low cotton rate

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button