Money | महिना संपताच पाकीट रिकामे होत आहे का ? ‘या’ सहा गोष्टी करून बघा ; आयुष्यात कधीच पैशाची कमी भासणार नाही !
महिना संपला की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. कितीही पैसे कमवा पण महिना संपत आला की पाकीट आपोआप रिकामे होते. महिनाभर काम करून शेवटी आर्थिक ताण (Finantial Stress) आला की प्रचंड वाईट वाटते. दरम्यान आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांनी नितीशास्त्रात (Nitishastra) अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक ताण येत नाही. यामध्ये त्यांनी आर्थिक नियोजन (Finance Management) आणि सुबत्ता यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
जर तुम्ही तुमच्या जीवनात आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीचा अवलंब केला तर यश, संपत्ती दोन्ही मिळते, शिवाय तुमचे आर्थिक चणचणीचे प्रश्नही सुटतात. व्यक्तीने जीवनात कोणत्याच अडचणींना घाबरू नये. जो धोका, रिस्क पत्करतो तोच यशस्वी होतो. आव्हानांना तोंड देतच यश मिळत असते. असे आचार्य चाणक्य सांगतात. दरम्यान पैसा टिकवून ठेवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आज जाणून घेऊयात.
वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …
१) योग्य वेळ आणि संधी ओळखा
तुम्हाला पैसा टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. चाणक्य नीती सांगते की, जो योग्यवेळी संधी ओळखून त्याचा फायदा घेतो तोच यशस्वी होतो. कोणत्याही व्यवसायात गुंतवणुक करण्यााधी त्याचे योग्य विश्लेषण करणे आवश्यक आहे.
२) कामात शिस्तबद्धता हवी
तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील, तर तुमच्या अंगी शिस्तप्रियता असायला हवी. अंगी शिस्त नसेल तर कुठलेच यश मिळू शकत नाही. तुमची कामे वेळच्या वेळी, योग्य पद्धतीने होणे आवश्यक असतात. जी माणसं अशी वागतात तेच यशस्वी होऊ शकतात असे चाणक्यनीती सांगते.
३) आयुष्यात आव्हाने स्वीकारा
आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी नव्या संधींची जोखिम पत्करावीच लागते. जो आयुष्यात रिस्क घेऊ शकतो तोच पुढे मोठे यश मिळवून आर्थिक लाभ मिळवू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा असेल तर रिस्क घ्यायला घाबरू नका.
वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
४) ज्ञान आणि कौशल्ये
जर तुम्हाला आयुष्यात खूप पुढे जायचे असेल तर तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. नवीन ज्ञान आणि कौशल्ये विकसीत करत राहणे आवश्यक असते तरच तुम्ही आर्थिक समस्यांना तोंड देण्यास यशस्वी ठरतात.
५) पैशांचे नियोजन करा
जेवढी मेहनत, हुशारी पैसा कमवताना वापरतात तेवढीच किंबहुना थोडी जास्तच हुशारी तो खर्च करताना वापरायला हवी. पैसा कुठे, कसा खर्च करत आहोत याच्या नोंदी आपल्याजवळ असाव्या. अनावश्यक खर्च किती, तो कसा टाळावा याचा विचारही करणे आवश्यक आहे.
Apply these six tips to avoid financial stress
हेही वाचा:
- पिकांना विद्राव्य खत देताय ? मग ही काळजी घ्याचं ; अन्यथा होऊ शकते नुकसान
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..