ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Whatsapp | व्हॉट्सअॅपवर आता मेसेजही एडिट करता येणार ! कंपनीने आणले ‘हे’ नवीन फिचर

व्हॉट्सअॅप ( Whatsapp) हे सर्वात प्रमाणात वापरले जाणारे मेसेंजिग अँप आहे. दरम्यान व्हॉट्सअॅपच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून विविध नवीन फिचर्स आणले जातात. मागील अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपचे युजर्स मेसेज एडिट (Edit msg ) करण्याचा पर्याय उपलब्ध होण्याची वाट पाहत होते.

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर

या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी मेसेज एडिट करण्याचा पर्याय आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या फक्त काही लोकांच्याच अॅपवर हे फिचर दिसत आहे. मात्र, लवकरच हे फीचर सर्वांच्या व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध होईल. परंतु, जर तुम्हाला अपडेट मिळत नसेल तर तुम्ही स्वतः प्लेस्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करु शकता.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

मार्क झुकरबर्ग यांनी दिली माहिती

व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या मदतीने यूजर्स चुकीचे टाईप झालेले किंवा पाठवलेले अपूर्ण मेसेज एडिट करु शकतात. मात्र यासाठी ठराविक वेळेची मर्यादा असणार आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वत: या फीचरची माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे फीचर आयओएस मोबाईल अॅपमध्ये सर्वात अगोदर उपलब्ध झाले आहे.

म्हणून फिचर महत्त्वाचे

बऱ्याचदा व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवताना आपल्याकडून टायपिंग मिस्टेक होतात. किंवा कधी कधी मेसेज चुकून पाठवले जातात. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. यावेळी युजर्सना मेसेज Delete For Everyone करून पुन्हा पाठवावा लागत होता.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मेसेज एडिट करण्यासाठी वेळेची मर्यादा

यामुळे मेसेज रिसिव्ह करणाऱ्या युझरला ‘ मेसेज डिलीट का केला’ यांचे उत्तर द्यावे लागत होते. मात्र व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे ही कटकट कमी झाली आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर तुम्ही फक्त 15 मिनिटांपूर्वी पाठवलेला मेसेज एडिट करु शकाल. या वेळेनंतर तुम्हाला मेसेज एडिट करायला असेल तर तो तुम्हाला करता येणार नाही.

व्हॉट्सअॅपवरील कॉल, मेसेज आणि मीडिया प्रमाणेच ‘एडिटेड मेसेज’ सुद्धा एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. तुम्ही एडिट केलेला मेसेज समोरील युझरला एडिट केलेला दिसतो, मात्र त्याला त्याची एडिटेड हिस्टरी दिसणार नाही.

मेसेज असा एडिट करा

१) व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा.
२) जो मेसेज एडिट करायचा असेल तो सिलेक्ट करा. ३) मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला तो मेसेज दीर्घकाळ धरुन ठेवावा लागेल.
४) याठिकाणी तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय दिसेल. ५) एडिट मेसेजवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करु शकता.
६) त्यानंतर सेंड केलेल्या मेसेजवर टाईप करताच ओरिजनल मेसेजच्या ठिकाणी एडिटेड मेसेज दिसू लागेल.

याशिवाय व्हॉट्सअॅपने अजून एक नवीन फिचर आणले आहे. याला चॅट लॉक फीचर म्हणतात. चॅट लॉक फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या वैयक्तिक चॅट लॉक करु शकतात. तसेच चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला ज्या चॅट लॉक करायच्या आहेत त्या प्रोफाईलवर जाऊन एनेबल चॅट लॉक या पर्यायावर क्लिक करावं लागेल. असं केल्यास चॅट दुसर्या फोल्डरमध्ये शिफ्ट होईल, याचा अॅक्सेस फक्त तुम्हालाच असू शकतो.

Whatsapp launched a new feature which edits the message

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button