ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Irrigation Scheme | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तुषार आणि ठिबक सिंचनासाठी मिळतंय तब्बल 80 टक्के अनुदान, जाणून घ्या सरकारची योजना…

Irrigation Scheme | शेतीसाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. पाण्याविना शेती शक्यच नाही, मग ते पावसाचं असो वा विहिरीचं. शेतीसाठी पाण्याचा साठा विहीर तलाव यांमध्ये केला जातो. यांना पाण्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शेतीला (Agriculture) पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसते. त्याचबरोबर पाण्याचा वापर व्यवस्थित केल्यास शेतीसाठी पाणी उरते. याचप्रमाणे शेतीला जर सिंचनाद्वारे (Irrigation Scheme) पाणी दिले तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. परंतु, आजच्या महागाईच्या युगात शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचन (Irrigation Scheme) बसवणे सोपे राहिलय का? याच पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचन बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. चला तर मग जाणून घेऊयात शेतकऱ्यांना सिंचनासाठी किती अनुदान दिले जाते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी अनुदान (Agricultural Subsidy) दिले जाते. अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान कमाल 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते.

पूरक अनुदान
शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. सिंचनासाठी शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च झोपणार नाही यासाठी सरकारने पूरक अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यासाठी राज्यात मुख्यमंत्री शाश्वत योजना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारची कृषी सिंचन योजना आणि राज्य सरकारची मुख्यमंत्री शाश्वत योजना या दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात येते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किती मिळते अनुदान?
केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचनासाठी अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. याचप्रमाणे मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत करांना 25 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचे अनुदान शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचनासाठी तब्बल 80 टक्के अनुदान 5 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळत आहे.

Web Title: Good news for farmers! As much as 80 percent subsidy is available for frost and drip irrigation, know the government’s plan

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button